
‘पाकिस्तानी क्रिकेटच्या सर्व परंपरेचं पालन करत आमिरनं रिटायरमेंट घेतली आहे, त्यामुळे रिटायरमेंट मागे घेऊन टीममध्ये परतणे ही या परंपरेची पुढची पायरी आहे.’ ‘Cricket मराठी’ ने पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरनं (Mohammad Amir) रिटायरमेंटची घोषणा केल्यानंतर लिहिलेल्या लेखातील हे वाक्य आहे. 18 डिसेंबर 2020 रोजी लिहिलेल्या या लेखाला सहा महिने होण्याच्या आत आमिरनं (Mohammad Amir ready for comeback) पुन्हा एकदा पाकिस्तानकडून खेळण्याची तयारी दाखवली आहे.
का झाला होता रिटायर?
मोहम्मद आमिरनं डिसेंबर महिन्यात मिसबाह-उल-हक (Misbah-ul-Haq) आणि वकार युनूस (Waqar Younis) यांचा समावेश असलेल्या पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफवर आरोप करत रिटायरमेंट जाहीर केली होती. न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या 35 जणांच्या संभाव्य टीममध्ये आमिरचे नाव नव्हते. त्यामुळे नाराज आमिरनं हा निर्णय घेतला होता.
मोहम्मद आमिरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. “मी या क्षणाला क्रिकेट सोडत आहे. मी इतका छळ सहन करु शकत नाही. जी गोष्ट घडली त्याची शिक्षा मी भोगली. पीसीबीनं माझ्यावर खूप गुंतवणूक केली असं सांगत लोकांनी माझा छळ केला आहे. मी माझ्यावरची बंदी पूर्ण करुन परतलोय. मी पाच वर्षांची बंदी पूर्ण केली आहे. एका वर्षात परत आलेलो नाही.” असा आरोप आमिरनं केला होता.
पाकिस्तान क्रिकेटमधील मिस्टर अनफिट!
आमिरची कारकिर्द
मोहम्मद आमिरनं वयाच्या सतराव्या वर्षी 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वयाच्या 18 व्या वर्षी टेस्टमध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम त्यानं केला. त्यामुळे त्याची तुलना थेट पाकिस्तानचा फास्ट बॉलर वासिम अक्रमशी (Wasim Akram) केली जात होती.
पाकिस्तान टीमनं 2010 मध्ये केलेल्या इंग्लंड दौऱ्यात आमिरची काळी बाजू जगाला दिसली. तो त्याचा सहकारी बॉलर मोहम्मद आसिफ आणि तेंव्हाचा कॅप्टन सलमान बट यांच्यासह स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला. आसिफला सात तर बटला 10 वर्ष क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. आमिर दोषींमध्ये सर्वात लहान असल्यानं त्याच्यावर सर्वात कमी म्हणजे पाच वर्षे क्रिकेटमध्ये बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
का परत येणार?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) सीईओ वासिम खान (Wasmim Khan) यांनी आमिरची काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली होती. पाकिस्तान सुपर लीग (PSL 2021) स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी ही भेट झाली. आमिर पीएसएलमध्ये कराची किंग्ज (Karachi Kings) टीमचा सदस्य आहे. ‘आपले मत पाकिस्तान टीमच्या मॅनेजमेंटनं चुकीच्या पद्धतीनं सादर केले होते. वासिम खान यांनी माझे सर्व आक्षेप ऐकून घेतले आहेत. तसेच याबाबत योग्य उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे.” असे आमिरने स्पष्ट केले. सर्व गोष्टी योग्य पद्धतीने घडल्यास मी पाकिस्तान टीमसाठी उपलब्ध (Mohammad Amir ready for comeback) असेन, असंही आमिर म्हणाला.
पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने देखील यापूर्वी आमिर टीममध्ये आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले होते. गेल्या सहा महिन्यांमध्ये आपल्याबद्दल बरंच सकारात्मक वातावरण तयार केल्यानंतर आमिर परत यायला तयार झाला आहे. त्याने सांगितलेल्या दोन व्हिलनपैकी वकार युनूस आता कोचिंग स्टाफचा सदस्य नाही. मिसबाह उल हक सोबतचे मतभेद दूर करण्यासठी PCB काय तोडगा काढणार आणि T20 वर्ल्ड कपपूर्वी आमिर कधी परतणार (Mohammad Amir ready for comeback) हे लवकरच स्पष्ट होईल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.