
क्रिकेट विश्वात आयपीएलची धूम सुरु असताना झिम्बाब्वेनं पाकिस्तान विरुद्ध (Zimbawe vs Pakistan) इतिहास घडवला. झिम्बाब्वेनं दुसऱ्या T20 मध्ये पाकिस्तानचा 19 रननं पराभव केला. हा झिम्बाब्वेचा पाकिस्तानवरील पहिलाच T20 विजय आहे. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमधील लाथाळ्या पुन्हा एकदा उघडपणे सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानचा माजी कॅप्टन शोएब मलिकनं तर टीमला नव्या आंतरराष्ट्रीय कोच (Pakistan need international coach) हवा आहे, अशी मागणी केली आहे.
झिम्बाब्वेनं पहिल्यांदा बॅटींग करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 120 रनचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानची स्थिती एकेकाळी 3 आऊट 74 अशी होती. त्यानंतर पाकिस्तानची घसरगुंडी सुरु झाली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांच्या शब्दाप्रमाणे मॅच ‘Iinteresting’ करणे ही पाकिस्तानच्या टीमची सवय आहे. त्यामुळे पुन्हा मॅचमध्ये टर्न येईल असं मॅच पाहणाऱ्यांना वाटलं होतं. पण पाकिस्तानची घसरगुंडी थांबली नाही. पाकिस्तानची संपूर्ण टीम 99 रनवर ‘ऑल आऊट’ झाली. तीन आकडी स्कोअर करण्यातही त्यांना अपयश आलं.
‘भित्र्या सशासारखे खेळले’
पाकिस्तानची झिम्बाब्वे विरुद्ध झालेली ही अवस्था पाहून रमीझ राजा चांगलाच संतापला आहे. त्यानं पाकिस्तानच्या बॅट्समनची तुलना ही भित्र्या सशाशी केली आहे. एका क्लब लेव्हलच्या (झिम्बाब्वे) टीम विरुद्ध पाकिस्तानच्या बॅट्समननी अत्यंत साधारण बॅटींग केली. हा पाकिस्तानच्या क्रिकेटमधील काळा अध्याय आहे, असं राजा म्हणाले.
Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे! तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही?
आजी क्रिकेटपटूही भडकला
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू प्रमाणे आजी क्रिकेटपटूही टीमच्या कामगिरीवर भडकला आहे. पाकिस्तानचा माजी कॅप्टन शोएब मलिक (Shoaib Malik) याने तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोचची मागणी (Pakistan need international coach) केली आहे.
“माझ्या मते आम्हाला आंतरराष्ट्रीय व्हाईट बॉल कोचची गरज आहे. ज्याला आमच्यामधील क्रिकेट समजेल. तो आमच्या खेळाडूंना आगामी काळात काय करायंच आहे ते सांगेल आणि कॅप्टनला तयार करेल. तुमचं मॅनेजमेंट हे आवड आणि नावड यावर अवलंबून असेल, आणि तुमचं क्रिकेट फक्त ‘surviving mode’ वर असेल तेंव्हा तुम्ही देश म्हणून काय अपेक्षा ठेवू शकता? त्याचबरोबर तुम्ही कॅप्टनला निर्णय घेऊ देणार नसाल तर हे होणं निश्चित आहे.” असं मलिकनं ट्विट केलं आहे.
चार दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा ‘एकलकोंडा आणि अलिप्त’
शोएब मलिक अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झालेला नाही. त्याला T20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यानं एका पराभवानंतर आंतरराष्ट्रीय कोचची मागणी करत (Pakistan need international coach) पाकिस्तानचा सध्याचा कोच मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq) वर खुन्नस काढली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटमधील लाथाळ्या उघड झाल्या आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.