फोटो – ट्विटर, आयसीसी

पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात लाहोरमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. श्रीलंकेच्या टीमवर लाहोरमध्येच 2009 साली दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या दहशतवादी हल्ल्यानंतर 13 वर्षांनी लाहोरमध्ये टेस्ट मॅच होत आहे. ऑस्ट्रेलियाच नाही तर पाकिस्तान टीममधील सर्व खेळाडू पहिल्यांदाच लाहोरमध्ये टेस्ट मॅच खेळत आहेत. लाहोरमध्ये प्रचंड बंदोबस्तामध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. मॅचचं विश्लेषण करण्यासाठी विदेशी कॉमेंटेटरही बोलवण्यात आले आहेत. या विदेशी कॉमेंटेटरना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) दहशत सहन करावी लागत आहे. लाहोरच्या फ्लॅट पिचबद्दल (Lahore Test flat pitch) बोलताना ऑस्ट्रेलियन कॉमेंटटरची बोबडीच वळाली. त्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

24 वर्षांतील रटाळ सीरिज

ऑस्ट्रेलियन टीम 24 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सरकार यांनी मोठे प्रयत्न केल्यानंतर हे शक्य झालं आहे. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सीरिजची मोठी हवा करण्यात आली होती. घरच्या मैदानात पाकिस्तान ऑस्ट्रेलियाला सहज लोळवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

प्रत्यक्षात ही गेल्या 24 वर्षातील सर्वात रटाळ पिच आहे अशीच भावना ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट फॅन्सची झाली आहे. रावळपिंडी आणि कराची या दोन्ही पिचवर बॉलर्सना कोणतीही मदत नव्हती. रावळपिंडी पिचवर तर आयसीसीनंही ताशेरे ओढलले. रावळपिंडीमध्ये 14 विकेट्सच्या मोबदल्यात 1187 रन निघाले. कराचीमध्ये 28 विकेट्सच्या मोबदल्यात 1,244 रन निघाले. थोडक्यात दोन्ही टेस्टमध्ये मिळून एकूण 80 पैकी फक्त 42 विकेट्स पडल्या आणि 2431 रन निघाले. रावळपिंडी असो वा कराची पाचव्या दिवशीही बॉलर्सना पिचकडून कोणतीही मदत झाली नाही.

पाकिस्तानचा मोठा पचका, रावळपिंडीच्या पिचवरून ICC नं काढली लाज!

PCB ची दहशत

रावळपिंडी आणि कराची टेस्ट ड्रॉ करण्यात रटाळ पिचचा मोठा वाटा होता. आता लाहोरमध्ये तिसरी आणि निर्णायक टेस्ट सुरू आहे. या टेस्टमध्येही पीसीबीचे धोरण बदलले (Lahore flat pitch)  नाही. या पिचवरही बॉलर्सना फार मदत मिळत नाही. तसंच पिचही इतकं संथ आहे की त्यावर पुरेसे रनही निघत नाहीत. टेस्ट क्रिकेटमध्ये 4 च्या सरासरीनं रन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना लाहोरमध्ये हातात विकेट असूनही 3 पेक्षा कमी सरासरीनं रन होत आहेत.

लाहोरचे पिचही फ्लॅट (Lahore Test flat pitch) आहे, हे सर्वांना दिसत आहे. या टेस्टसाठी कॉमेंट्री करताना ऑस्ट्रेलिचा माजी फास्ट बॉलर मायकल कॅस्प्रोविझ (Michael Kasprowicz) याच्या तोंडातून पिच प्लॅट असल्याचं सत्य निघून गेलं. त्यानंतर त्याला तातडीने ही चूक सावरून घ्यावी लागली. कॅस्प्रोविझचा गोंधळ कसा उडाला याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

सत्य लपणार नाही

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमिझ राजा (Ramiz Raja) यांनी पिचबद्दल कोणतेही नकारात्मक वक्तव्य करू नये असे निर्देश दिल्याचे वृत्त आहे, त्यामुळेच कॅस्प्रोविझला बोलताना ही कसरत करावी लागली.

पीसीबी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत कॉमेंट्री पॅनलवरील खेळाडूंना गप्प करू शकते. पण, पाकिस्तानातील टेस्ट सीरिज पाहणाऱ्या जगभरातील प्रेक्षकांना पिचचं सत्य (Lahore Test flat pitch)  दिसत आहे. हे सत्य कधीही लपणार नाही. पाकिस्तानातील पिच या नकारात्मकच आहेत. असा स्पष्ट संदेश या सीरिजमधून जगभर गेला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: