सौजन्य- ट्विटर

लेखक: वरद सहस्रबुद्धे

मागच्या वर्षी झालेल्या T20 वर्ल्डकपमुळे (T20 World Cup 2021) मोहम्मद रिझवान हे नाव भारतीय क्रिकेट रसिकांना नवीन नाही. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) या जोडीने केलेली नाबाद 152 रन्सच्या पार्टनरशिपमुळे भारताच्या सेमी फायनलच्या आशांना सुरूंग लावला होता. बाबर आझम (Babar Azam) हा सातत्यपूर्ण कामगिरी आणि कॅप्टनसीमुळे पाकिस्तान क्रिकेटचा चेहरा बनला आहे. त्याचबरोबर बाबर आझमला क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात तोलामोलाची साथ देणारा रिझवान देखील कौतुकास पात्र आहे. आज कराची टेस्टमध्ये रिझवाननं केलेली सेंच्युरी (Rizwan century in Karachi test) त्याचंच उदाहरण आहे

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील कराची टेस्टच्या ( Australia vs Pakistan Karachi Test) चौथ्या आणि पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात बाबर आणि रिझवानचा जलवा पाहायला मिळाला. बाबर आझमने दोन वर्षापासून सुरू असलेला सेंच्युरीचा दुष्काळ .(Babar Azam Ends Test Century Drought) संपवलाशेवटच्या दिवशी स्टार्क, लायन, कमिन्स या या बॉलिंग अटॅक समोर अप्रतिम 196 रन्सची खेळी साकारली. डबल सेंच्युरी न झाल्याचं शल्य कुठेतरी त्याच्या मनात असणार. बाबर आऊट झाला तरी पाकिस्तान पराभवाच्या सावलीतून बाहेर आला नव्हता.

लायनचं जाळं आणि रिझवानचा संयम

बाबर आऊट झाला तेव्हा पाकिस्तानचा स्कोर 5 आऊट 392 होता. त्यापूर्वी बाबर-रिझवान जोडीनं 115 रनची पार्टनरशिप केली होती. पाठोपाठ फहीम अश्रफ देखील स्टीव स्मिथच्या हाती कॅच देत शून्यावर आऊट झाला. चार ओव्हर्सच्या अंतरानं साजिद खान लायनची चौथी विकेट ठरला. त्यावेळी पाकिस्तानला मॅच वाचवण्यासाठी 9 ओव्हर्स खेळुन काढणं गरजेचे होते. तर ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सची आवश्यकता होती. एकीकडे विकेट्स पडत असताना रिझवान दुसऱ्या बाजूनं पिचवर नांगर टाकून उभा होता. रिझवाननं शेवटच्या ओव्हर्स खेळून काढल्याच त्याचबरोबर टेस्ट कारकिर्दीतील दुसरी सेंच्युरी (Rizwan century in Karachi Test) देखील झळकावली. चौथ्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा रिझवान हा पाकिस्तानचा दुसरा विकेटकिपर- बॅटर आहे.

PAK vs AUS : पाकिस्ताननं कराची टेस्ट वाचवली! बाबर, रिझवानची सेंच्युरी

तीन वर्षांनंतर कमबॅक….

2016 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रिझवानला सुरुवातीच्या वर्षात क्रिकेटच्या तीन्ही प्रकारांत फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्यातच सर्फराज अहमदने एक विकेटकीपर आणि कॅप्टन म्हणून संघात जागा फिक्स केली होती. त्या काळात रिझवान बॅकअप विकेट किपर म्हणून संघात कायम असायचा. अखेरीस सर्फराजच्या अपयशामुळे आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातल्यामुळे रिझवानसाठी टेस्ट क्रिकेटचे दार पुन्हा उघडले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीला कमबॅक करण्याची रिझवानला संधी मिळाली. 5 आऊट 94 अशा नाजूक स्थितीत असताना रिझवान बेटिंगला आला. त्या डावात केलेल्या कमिन्स, स्टार्क, हेझलवुड या फास्ट बॉलिंग युनिट समोर केलेल्या 95 रनच्या खेळीनं त्याचा आत्मविश्वास दुणावलाच तसंच करिअरला कलाटणी मिळाली.

कमरान अकमल, पाकिस्तानी क्रिकेटचा अस्सल चेहरा!

SENA मध्ये बोलबाला

रिझवाननं ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या इनिंगनंतर न्यूझीलंड, इंग्लंडमध्ये देखील हाफ सेंच्युरी झळकावली. इंग्लंडमध्ये ओल्ड ट्रेफोर्डला दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्यूरी केली. त्या टेस्टमध्ये टीमची पडझड थांबवण्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडली. या खेळींमुळेच रिझवाननं टेस्टसह व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये ‘फर्स्ट चॉइस विकेटकिपर’ म्हणून त्याची जागा फिक्स केली.

अनसंग हिरो

कराची टेस्ट वाचवल्यानं बाबर आझमचं जोरदार कौतुक होत आहे. त्याचबरोबर ही टेस्ट वाचवण्यात रिझवानचं योगदान विसरून चालणार नाही. एकूणच सध्याच्या पाकिस्तान क्रिकेटचा (Pakistan Cricket) मोहम्मद रिझवान हा अनसंग हिरो आहे. 2021 साली सर्व प्रकारच्या टी20 क्रिकेटमध्ये मिळुन रिझवानने 2036 रन्स काढल्या. एका कॅलेंडर वर्षात आत्तापर्यंत कोणत्याही खेळाडुने 2000 रन्स केलेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 रन्स करणारा रिझवान पहिला क्रिकेटपटू ठरला होता. पॉल स्टर्लिंगचा 748 रन्सचा रेकॉर्ड त्याने मोडीत काढला.

मोहम्मद रिझवाननं त्याच्या मेहनतीनं, खेळातील मर्यादा ओळखून, त्या मर्यादांवर होमवर्क करून खेळात विशेषत: विकेटकीपिंगमध्ये सुधारणा केली आहे. सध्याच्या क्रिकेटमध्ये सक्रीय असलेल्या खेळाडूंमध्ये तो एक सर्वोत्तम विकेटकिपरपैकी आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे 2020 मध्ये पाकिस्तान टीमचा व्हाईस कॅप्टन केले. कराची टेस्टमध्ये तो त्या पदाला जागलाय.

या साडेपाच फुटी विकेटकिपरनं दुसरी सेंच्युरी मारली आहे. इशान किशनला (Ishan Kishan) पॉकेट डायनामाईट म्हणतात, रिझवान पाकिस्तानी क्रिकेटचा पॉकेट डायनामाईट आहे आणि त्याने कराची टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांना सुरूंग (Rizwan century in Karachi Test) लावला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: