
इंग्लंडने वन-डे सीरिजमध्ये पाकिस्तानचा (PAK vs ENG) 3-0 असा सरळ पराभव केला आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) तर या पराभवामुळे संतुलन गेलंय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, त्याने शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) एक भयंकर सल्ला दिला आहे. हा सल्ला ऐकूण अख्तर क्रिकेटर आहे की गँगस्टर? (Akhtar, Cricketer or Gangster?) असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.
परंपरा जुनीच, पण…
पाकिस्तानची इंग्लंडमध्ये वन-डे सीरिज हरण्याची परंपरा ही 1974 पासून आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या सर्व ‘ग्रेट’ टीम आणि ‘महान’ कॅप्टनना इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं आहे. बाबर आझमनं (Babar Azam) देखील ती परंपरा पुढे सुरु ठेवलीय. पण यंदा पाकिस्तान कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे संपूर्ण नवीन तयार झालेल्या इंग्लंडच्या टीमकडून वन-डे सीरिजमध्ये सरळ पराभूत झालं आहे. त्यामुळे या पराभवाचे पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे पडसाद उमटत आहेत.
331 रननंतरही पराभव
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन वन-डेमध्ये पाकिस्तानच्या बॅट्समननी निराशा केली होती. पहिल्या दोन वन-डेमध्ये इंग्लंडच्या नवोदीत बॉलिंग अटॅकसमोर पाकिस्ताच्या बॅट्समनला पूर्ण 50 ओव्हर्सही खेळता आलं नाही. त्यामुळे तिसऱ्या वन-डेपूर्वीच सीरिजचा निकाल लागला होता. तिसऱ्या वन-डेमध्ये सीरिज गमावल्यानंतर अखेर बाबर आझमने सेंच्युरी झळकावली. बाबरने 158 रन काढले. हा कोणत्याही पाकिस्तानी कॅप्टनचा वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर आहे.
बाबरच्या या मोठ्या इनिंगनंतर पाकिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 331 असा स्कोअर केला होता. बॅट्समनच्या चांगल्या कामगिरीनंतर निराशा करण्याची पाळी बॉलर्सची होती. इंग्लंडने 3 विकेट्स राखत हे आव्हान पार केले. जेम्स विन्सीचे (James Vince) 102 रन आणि या सीरिजमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लुईस ग्रेगरी (Lewis Gregory) याचे 77 रन यांच्या जोरावर इंग्लंडने विजय मिळवला.
Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे! तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही?
पराभवानंतर अख्तर संतापला
या पराभवानंतर शोएब अख्तर (Akhtar, Cricketer or Gangster?) पाकिस्तानच्या न्यूज चॅनलशी बोलताना अख्तरनं केलेल्या विधानाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये अख्तर आफ्रिदीला उद्देशून म्हणतो,’मी कोच असतो तर शाहीन आफ्रिदीला सांगितलं असतं ग्रेगरीला मार. त्याचा जीव घे. मॅचचं हरू ना, पण याचा चेहरा सुजला पाहिजे.’
@Abhiandan673 या ट्विटर हँडलवरुन अख्तरच्या या भयंकर सल्ल्याची क्लीप शेअर करण्यात आली आहे. त्यावेळी अख्तर हा क्रिकेटर आहे की गँगस्टर? (Akhtar, Cricketer or Gangster?) असा प्रश्न या यूझरनं विचारला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.