फोटो – ट्विटर

देशाच्या निर्मितीपासून स्पर्धात्मक खेळणारा पाकिस्तान हा कदाचित आयसीसीचा (ICC) एकमेव सदस्य असावा. पाकिस्तान क्रिकेट टीमनं 1952 साली पहिली टेस्ट मॅच खेळली. आजवरच्या सर्व आयसीसी स्पर्धेत ही टीम सहभागी झाली आहे. यापैकी 3 स्पर्धेचं त्यांनी विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतरही पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट 10 वर्षांपेक्षा जास्त काळ बंद होते. आज त्या देशात कोणत्या टीमनं दौरा निश्चित केला तर ती मोठी उपलब्धी बनते. तो दौरा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडला तर ती त्याहून मोठी उपलब्धी मानली जाते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं पाकिस्तानात खेळण्यास कुणी तयार का नसते याचे कारण (PCB CEO on Pakistan) सांगितले आहे.

काय आहे परिस्थिती?

पाकिस्तानातील सर्वात प्रमुख शहर असलेल्या लाहोरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या जवळ अगदी कडेकोट बंदोबस्त असेल्या भागात श्रीलंकेच्या टीमवर 2009 साली दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ती टीम थोडक्यात वाचली. त्यानंतर 10 वर्षांहून अधिक काळ कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमनं पाकिस्तानचा दौरा केला नाही.

न्यूझीलंडची टीम यावर्षी पाकिस्तान दौऱ्यावर आली. त्यांनी टॉसच्या काही तास आधी पीसीबी आणि पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या विनंतीला धुडकावून लावत सुरक्षेच्या कारणामुळे माघार घेतली. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही यावर्षीचा पाकिस्तान दौरा रद्द केला.

VIDEO: रॅपर ओम प्रकाश मिश्रामुळे झाला न्यूझीलंडचा दौरा रद्द! नव्या दाव्यानंतर पाकिस्तानचं जगभरात हसं

काय आहे कारण?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त CEO फैसल हसनैन (Fasial Hasnain) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विदेशी खेळाडू पाकिस्तानात येण्यास घाबरतात याची कबुली दिली आहे. हैसनन यांनी यापूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमध्येही काम केले आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाकिस्तानच्या प्रतिमेची पूर्ण जाणीव (PCB CEO on Pakistan)  आहे.

‘मी झिम्बाब्वे क्रिकेट आणि आयसीसीसोबत काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं तर पाकिस्तान क्रिकेटबद्दल जगात काय चर्चा होते, याची मला कल्पना आहे. पाकिस्तान या देशाबद्दल असलेली जगातील प्रतिमा हे याचे मुख्य कारण आहे. पाकिस्तानच्या प्रतिमेमुळे बड्या टीमना देशात आमंत्रण देणे हे अवघड बनते. ही फक्त पाकिस्तान क्रिकेटची नाही, तर व्यापार आणि पर्यटनाचीही समस्या आहे.

पाकिस्तानमध्ये गेलात तर जवळपास एक महिना रूमच्या बाहेर जाता येणार नाही. तेथील पिच निर्जिव आहेत. मैदानात प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी येत नाहीत.  तो अतिशय धोकायदाक देश आहे. तिथं वीजेची मोठी समस्या आहे. या सर्व या देशांच्या धारणा आहेत.

आयसीसीच्या नोटीस बोर्डावर याबाबतचं पाकिस्तानच्या बातम्यांना स्थान मिळालेसं मी वाचलं आहे,’ असे हसनैन यांनी सांगितले. पाकिस्तानी मीडियाच्या माध्यामातून ही प्रतिमा बदलण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला आहे. हसनैन यांनी नवी जबाबदारी घेताच संकल्प जाहीर (PCB CEO on Pakistan) केलाय, पण त्यांच्या संकल्पाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सर्वात मोठे बॉस आणि पंतप्रधान इम्रान खान सरकारची किती मदत मिळते यावरच संकल्पपूर्ती अवलंबून असेल.

यासिर शाह, बाबर आझमसह 11 क्रिकेटपटूंवर झाले आहेत बलात्काराचे आरोप, एका भारतीयाला 6 वर्षांची शिक्षा

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: