फोटो – ट्विटर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळताच पाकिस्तान (Pakistan) सध्या चर्चेत आहेत. पाकिस्तान क्रिकेटला या आठवड्यात दोन मोठे धक्के बसले आहेत. त्यामधून सावरण्यास त्यांना वेळ लागणार आहे. न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) या दोन देशांनी पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) चांगलेच संतापले आहेत. त्यांनी पाकिस्तान या दोन देशांचा बदला (PCB on Tour cancellations) घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

का घेणार बदला?

न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या टीमनंही पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंडची टीम पाकिस्तानात आली. त्यांनी पहिल्या वन-डे मॅचचा टॉस होण्यास काही मिनिटं बाकी असतानाच दौरा सुरक्षेच्या कारणामुळे रद्द करत असल्याचं (New Zealand pull out from Pakistan tour) जाहीर केलं. हा दौरा रद्द होऊ नये म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

न्यूझीलंडनं पाकिस्तानचा दौरा रद्द करताच काही दिवसांनी इंग्लंडनंही पाकिस्तानात जाणार नसल्याचं (England cancel cricket tour of Pakistan) जाहीर केलं. इंग्लंडची पुरूष आणि महिला टीम ऑक्टोबर महिन्यात लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात येणार होती.

तालिबान मित्र पाकिस्तानची पुन्हा नाचक्की, न्यूझीलंडनंतर इंग्लंडनंही केला दौरा रद्द

‘आमच्या विरुद्ध सर्व एकत्र’

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) मंगळवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये अध्यक्ष रमीझ राजा यांनी दौरा रद्द करणाऱ्या दोन्ही देशांवर टीका केली आहे. ‘इंग्लंडनं पाकिस्तानता दौरा रद्द केल्यानं मी निराश आहे, पण हेच अपेक्षित होते. कारण, पश्चिमी देश एकत्र येतात आणि एकमेकांना पाठिंबा देतात. तुम्ही सुरक्षेला धोका असल्याची समजूत करुन कोणताही निर्णय घेऊ शकता. आम्हाला राग आला आहे. आधी न्यूझीलंडनं त्यांना कोणता धोका आहे, याची माहिती न देता दौरा रद्द केला. आता इंग्लंडचा हा निर्णय अपेक्षित (PCB on Tour cancellations) होता.’  

पीसीबी अध्यक्षांनी पुढे सांगितले की, ‘हा आमच्यासाठी एक धडा आहे. आम्ही या देशाचा दौरा करतो त्यावेळी आम्हाला कडक क्वारंटाईन पाळावा लागतो. आम्ही त्यांच्या सूचना सहन करतो. आता आम्ही धडा घेतला आहे. आम्ही आमच्या हिताच्या आहेत त्याच गोष्टी इथून पुढे करणार आहोत.’

आफ्रिदीचं तालिबानी प्रेम समजल्यावर तुमचा होईल संताप, VIDEO

कसा घेणार बदला?

रमीझ राजा यांनी यावेळी पाकिस्तान या देशांचा बदला कसा घेणार हे देखील सांगितलं. ते म्हणाले, ‘आता आम्ही T20 वर्ल्ड कपसाठी जाणार आहोत. तिथं आमच्या टार्गेटवर भारतासह न्यूझीलंड आणि इंग्लंड हे देश देखील असतील. आम्ही स्वत:ला मजबूत करणार आहोत. तसंच आम्ही हरणार नाही, या मानसिकतेमधून खेळणार आहोत. कारण, तुम्ही आमच्याबरोबर योग्य केलेलं नाही. आम्ही याचा बदला मैदानात घेऊ.’

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी दौरा रद्द केल्यानं (PCB on Tour cancellations) निर्माण झालेला गॅप भरुन काढण्यासाठी आम्ही बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे बोर्डाशी चर्चा करत आहोत. पण या दौऱ्यासाठी काही अडचणी आहेत, असंही राजा यांनी यावेळी सांगितले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: