फोटो – ट्विटर

खराब फॉर्ममुळे टीम इंडियातील जागा गमावलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत सूर गवसला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मुंबईची कॅप्टनसी सांभाळणाऱ्या पृथ्वीने सौराष्ट्र विरुद्ध (Mumbai vs Saurashtra) सेंच्युरी झळकावली. पृथ्वीच्या 123 बॉलमध्ये नाबाद 185 रनच्या (Prithvi Shaw 185*) जोरावर मुंबईनं सौराष्ट्राचा 9 विकेट्सनं पराभव करत विजय हजारे स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आक्रमक पृथ्वी

दिल्लीमध्ये झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबई समोर विजयासाठी 285 रनचे आव्हान होते. मुंबईने हे आव्हान 9 विकेट्स आणि 49 बॉल राखून पूर्ण केले. या विजयात पृथ्वी शॉ चे मोठे योगदान होते. त्याने 123 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 21 फोरच्या मदतीनं नाबाद 185 रन (Prithvi Shaw 185*)  केले. त्याचा या इनिंगमधील स्ट्राईक रेट हा 150.41 इतका खणखणीत होता. त्यानं यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) सोबत पहिल्या विकेटसाठी 238 रनची भागिदारी केली. यशस्वीनं 75 रन काढले.

पृथ्वीचा जबरदस्त फॉर्म

पृथ्वी शॉ ने या स्पर्धेची सुरुवातच जबरदस्त केली. त्याने दिल्ली विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये 89 बॉलमध्ये नाबाद 105 रन काढले. त्यानंतर महाराष्ट्राविरुद्ध 38 रन काढल्यानंतर पुन्हा पुदुच्चेरी विरुद्ध त्याची बॅट चालली. त्या मॅचमध्ये त्यानं 152 बॉलमध्ये नाबाद 227 रन काढत अनेक विक्रमांना गवसणी घातली. राजस्थान विरुद्ध 36 आणि हिमाचाल प्रदेश विरुद्ध 2 रन काढणाऱ्या पृथ्वीनं सौराष्ट्रा विरुद्ध नाबाद 185 रन (Prithvi Shaw 185*) करत या स्पर्धेतील तिसरी सेंच्युरी झळकावली आहे.

पृथ्वी शॉ चा विजय हजारे ट्रॉफीतील जबरदस्त खेळ

प्रतिस्पर्धी टीमरन
दिल्ली105*
महाराष्ट्र38
पुदुच्चेरी227*
राजस्थान36
हिमाचल प्रदेश2
सौराष्ट्र185*

पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आत्तापर्यंत 1 डबल सेंच्युरी आणि 2 डबल सेंच्युरीनं तब्बल 196.33 च्या सरासरीनं 589 रन केले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत सध्या तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

( वाचा : 20 वर्षाच्या पोरानं झळकावली सलग तिसरी सेंच्युरी, टीम इंडियाच्या दारावर केली टकटक )

यापूर्वी सौराष्ट्रानं पहिल्यांदा बॅटींग करताना 50 ओव्हरमध्ये 5 आऊट 284 रन केले होते. सौराष्ट्राकडून समर्थ व्यासनं 71 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीनं नाबाद 90 रन केले. तर चिराग जानीने 38 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली.

टीप – सर्व आकडेवारी ही 9 मार्च 2021 पर्यंतची आहे. * खूण नाबाद असे दर्शविते

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading