फोटो – ट्विटर

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत (Pakistan Super League 2022) खेळ भावनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. या स्पर्धेतील लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars)  टीमचा फास्ट बॉलर हॅरीस राऊफनं त्याच्या सहकाऱ्याला थप्पड (Haris Rauf Slapped Teammates) लगावली. राऊफ हा पाकिस्तानच्या इंटरनॅशनल टीमचा खेळाडू आहे. त्याने केलेल्या या कृतीने त्याच्यावर टीका होत आहे.

नेमके काय झाले?

लाहोर कलंदर्सची सोमवारी रात्री लीग स्टेजमधील शेवटची मॅच पेशावर झाल्मी विरूद्ध (Lahore Qalandars vs Peshawar Zalmi) होती. या मॅचमध्ये लाहोरची पहिल्यांदा बॉलिंग होती. राऊफच्या बॉलिंगवर त्याचा टीममधील सहकारी कमरान गुलाम (Kamran Ghulam) याने एक कॅच सोडला. त्यानंतर काही वेळानं राऊफला एक विकेट मिळाली.

राऊफला विकेट मिळतात लाहोर कलंदरचे सर्व खेळाडू या विकेटचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र जमले. त्यावेळी राऊफ आणि कमरान हे एकमेकांच्या समोर आले. कमरानला समोर पाहातच राऊफला जुनी घटना आठवली. त्याने संतापून कमरानला थोबाडीत (Haris Rauf Slapped Teammates)  मारली. त्यानंतर अन्य खेळाडूंनी हस्तक्षेप करत प्रकरण वाढू दिलं नाही.

हे पहिले प्रकरण नाही

पाकिस्तान सुपर लीग प्रकरणात खेळाडूंच्या वादाचे हे पहिलेच प्रकरण नाही. पाकिस्तानचा फास्ट बॉलर सोहेल तन्वीर (Sohail Tanvir) आणि ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर बेन कटींग (Ben Cutting) यांनी 4 वर्ष जुने भांडण उकरून काढत मॅचच्या दरम्यान अश्लील वर्तन केले होते.

पेशावर झाल्मी विरूद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स (Peshawar Zalmi vs Quetta Gladiators) या मॅचमध्ये हा प्रकार घडला होता. या स्पर्धेत तन्वीर क्वेटाकडून तर कटींग पेशावरकडून खेळत आहेत. या प्रकरानंतर दोन्ही खेळाडूंच्या मॅच फिसमधील 15 टक्के रक्कम कापून घेण्यात आली.

पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूत मैदानात राडा, 4 वर्षांपूर्वीच्या भांडणाची काढली खुन्नस, VIDEO

कुणी जिंकली मॅच?

हॅरीस राऊफनं थप्पड लगावलेल्या (Haris Rauf Slapped Teammates) मॅचमध्ये पेशावरनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 158 रन केले. पेशावरकडून अनुभवी शोएब मलिकनं सर्वाधिक 32 रन काढले. लाहोरच्या शाहिन आफ्रदी आणि हॅरीस राऊफ या पाकिस्तान टीममधील प्रमुख बॉलर्सना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

159 रनचा पाठलाग करताना लाहोरची सुरूवात खराब झाली. पाकिस्तान टीममधील प्रमुख खेळाडू फखर झमन शून्यावर आऊट झाला. त्यानंतर लाहोरच्या ठराविक अंतरानं विकेट गेल्या. लाहोरकडून मोहम्मद हाफिजनं सर्वाधिक 49 रन केले. राऊफची थप्पड खालेल्या कमरान गुलामनं 25 रन केले.

पाकिस्तानच्या माजी कॅप्टनमध्ये जाहीर वाद, एक म्हणाला फिक्सर, तर दुसऱ्यानं कंडक्टर म्हणून केली हेटाळणी

लाहोरला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 24 रन हवे होते. शाहिन आफ्रिदीनं 6 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 23 रन करत ही मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली. सुपर ओव्हरमध्ये लाहोरला कमाल करता आली नाही. त्यांनी फक्त 5 रन केले. 6 रनचे टार्गेट पेशावरच्या शोएब मलिकनं सलग दोन फोर लगावत 2 बॉलमध्येच पूर्ण केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: