फोटो – टाईम्स ऑफ इंडिया

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेतील (Syed Mushtaq Ali Trophy 2021) मुंबईचं (Mumbai) आव्हान संपुष्टात आलं आहे. एलिट ग्रुपमधील E गटातील सामन्यात भारतीय क्रिकेटमध्ये नवख्या पुदुच्चेरीनं (Puducherry)  मुंबईचा 6 विकेट्सनं पराभव केला. मुंबईचा या स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. या पराभवामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

मुंबई ऑल आऊट 94!

मुंबईची क्रिकेट टीम ही भारतीय क्रिकेटला बॅट्समन पुरवणारी फॅक्ट्री म्हणून ओळखली जाते. सध्या टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) हे मुंबईचेच आहेत. मुश्ताक अली स्पर्धेत खेळणाऱ्या मुंबईच्या टीममध्येही आयपीएलसह सर्व देशांतर्गत स्पर्धा गाजवणारे खेळाडू आहेत. उज्जवल परंपरा, भक्कम रेकॉर्ड पाठिशी असूनही रविवारच्या मॅचमध्ये मुंबईची टीम पहिल्यांदा बॅटिंग करताना फक्त 94 रनवर ऑल आऊट झाली.

पुदुच्चेरीच्या टीममध्ये एकही मोठा बॉलर नव्हता, तरी मुंबईच्या आठ बॅट्समनना दोन अंकी रन करता आले नाहीत. टीम इंडियाच्या प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेला मुंबईचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 8 रन काढून आऊट झाला. सूर्यकुमार यादवनं या स्पर्धेत आतापर्यंत 4 मॅचमध्ये फक्त 53 रन केले आहेत.

( वाचा : Explained: ब्रिस्बेन टेस्टमध्ये रोहित शर्मा खरंच चुकला का? )

बॅटिंग ऑर्डर फेल

मुंबईची कागदावर भक्कम असणारी बॅटिंग ऑर्डर या स्पर्धेत फेल गेली. कॅप्टन सूर्यकुमारसह यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal), आदित्य तरे (Aditya Tare) सिद्धेश लाड (Siddhesh Lad), सर्फराज खान (Sarfaraz Khan) आणि शिवम दुबे (Shivam Dube) अशी तगडी बॅटींग ऑर्डर मुंबईची या स्पर्धेत होती. यापैकी शिवम दुबेचा अपवाद वगळता एकानंही चार मॅचमध्ये मिळून 100 पेक्षा जास्त रन्स केलेले नाहीत. शिवम दुबेनंही शंभरपेक्षा थोडे जास्त म्हणजे 117 रन केले आहेत.

शंभरी गाठण्यातही अपयश

पुदुच्चेरी विरुद्धच्या लढतीत मुंबईला तीन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. मुंबईकडून शिवम दुबेनं सर्वात जास्त 28 रन काढले. आकाश पारकरनं शेवटी 20 रन काढल्यानं मुंबईला 94 पर्यंत मजल मारता आली. पुद्दुचेरीनं 95 रन्सचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) 33 रन देऊन 1 विकेट घेतली.

( वाचा : SMAT: अर्जुन सचिन तेंडुलकरचं मुंबईकडून पदार्पण, पहिल्या मॅचमध्ये घेतली एक विकेट -VIDEO )

सलग चौथा पराभव

मुंबईचा मुश्ताक अली स्पर्धेतील हा सलग चौथा पराभव आहे. पहिल्या सामन्यात त्यांचा दिल्लीनं 76 रननं पराभव केला. त्यानंतर केरळ आणि हरयाणा या दोन्ही टीम्सनं 8 विकेट्सनं मुंबईला पराभूत केलं होतं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: