फोटो – ट्विटर/@BCCIdomestic

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेतून (Syed Mushtaq Ali Trophy 2021) गतविजेत्या कर्नाटकचं (Karnataka) आव्हान संपुष्टात आलं आहे. अहमदाबादमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या सरदार वल्लभाई पटेल स्टेडियममध्ये (Sardar Patel Stadium, Motera, Ahmedabad) पहिल्यांदाच मंगळवारी (26 जानेवारी 2020) मॅच झाली. या मॅचमध्ये पंजाबनं (Punjab) कर्नाटकचा 9 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. या विजयासह पंजाबनं या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

कर्नाटकवर नामुष्की!

पहिल्या क्वार्टरफायनलमध्ये पंजाबनं टॉस जिंकून कर्नाटकला बॅटिंगचं निमंत्रण दिलं. देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि कॅप्टन करुण नायर (Karun Nair) या पॉवरफुल जोडीनं कर्नाटकच्या इनिंगची सुरुवात केली. नायर (12) तर पडिक्कल (11) रन काढून अवघ्या चार बॉलच्या अंतरानं आऊट झाले. त्यापाठोपाठ सिद्धार्थ कौलनं (Siddarth Kaul) पवन देशांपाडेला शून्यावर आऊट करत कर्नाटकला तिसरा धक्का दिला. पवनचा मिडविकेटला मयंक मार्कंडेयनं (Mayank Markande) जबरस्त कॅच घेतला.

या तीन धक्क्यानंतर कर्नाटकची इनिंग सावरलीच नाही. सिद्धार्थ कौलसह संदीप शर्मा (Sandeep Sharma) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या फास्ट बॉलर्सनी कर्नाटकच्या इनिंगवर वर्चस्व गाजवलं. या तिघांनी मिळून सात विकेट्स घेतल्या. कर्नाटकची संपूर्ण इनिंग फक्त 88 रन्सवर ऑल आऊट झाली. अनिरुद्ध जोशीनं सर्वात जास्त 27 रन काढले. श्रेयस गोपाळनं (Shreyas Gopal) 13 रन काढले. या दोघांच्या शिवाय कर्नाटकचा एकही बॅट्समन दोन आकडी धावसंख्या (स्कोअर) करु शकला नाही.

पंजाबची अडखळती सुरुवात

89 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अडखळती झाली. अनुभवी अभिमन्यू मिथूननं अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) पहिल्याच ओव्हरमध्ये 4 रनवर आऊट केलं. त्यानंतर या स्पर्धेत फॉर्मात असलेला प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) आणि पंजाबचा कॅप्टन मनदीप सिंग (Mandeep Singh) यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही.

( वाचा : SMAT: प्रभ‘सिमरन’च्या जबरदस्त फॉर्ममुळे पंजाबचं ‘राज’ कायम! )

प्रभसिमरननं 37 बॉलमध्ये नाबाद 49 रन काढले. तर मनदीप 33 बॉलमध्ये 35 रन काढून नाबाद राहिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 85 रन्सची पार्टरनरशिप करत पंजाबला 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवून दिला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: