
आयपीएल 2020 मधील (IPL 2020) किंग्ज इलेव्हन पंजाब (KIXP) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या मॅचमध्ये शेवटी पंजाबच्या टीमला हाणामारीची गरज होती. त्या निर्णायक प्रसंगी ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) आधी पंजाबचा (Punjab) विकेटकिपर बॅट्समन प्रबसिमरन सिंहला (Prabhsimarn Singh) बढती देण्यात आली होती. पंजाबचा तो प्रयोग फसला. त्यामुळे टीम मॅनेंजमेंटवर टीका झाली होती. त्या मॅचनंतर मागील आयपीएलमध्ये प्रभसिमरनला फारशी संधी मिळाली नाही.
आयपीएलमध्ये मॅक्सवेलच्या आधी आपल्याला का पाठवलं होतं, हे प्रभसिमनरन सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत दाखवत आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2021) या स्पर्धेतील चार मॅचमध्ये चार हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्यानं या स्पर्धेत आतापर्यंत 134 च्या सरासरीनं 268 रन्स केले आहेत. सर्वाधिक रन्स काढणाऱ्या बॅट्समन्सच्या यादीत तो सध्या टॉपवर आहे.
( वाचा : SMAT : CSK मधून हकालपट्टीटची भीती असलेल्या बॅट्समनची सलग दुसऱ्यांदा आक्रमक खेळी! )
पंजाबचं ‘राज’ कायम!
पंजाबची शनिवारी लढत जम्मू आणि काश्मीरशी (Jammu and Kashmir) होती. ‘अ’ गटातील या मॅचमध्ये पंजाबनं 10 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पहिल्यांदा बॅटींग करताना जम्मू काश्मीरनं 8 आऊट 139 पर्यंतच मजल मारली. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ऑल राऊंडर अब्दुल समदनं (Abdul Samad) 4 चौकार मारुन चांगली सुरुवात केली होती. मात्र त्याला 17 रनवर सिद्धार्थ कौलनं (Siddarth Kaul) आऊट केलं. पंजाबकडून सिद्धार्थ हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 33 रन्स देऊन 4 विकेट्स घेतल्या.
( वाचा : IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद ‘ते शेवटपर्यंत लढले’ )
पंजाबनं हे आव्हान 10 विकेट्स राखून आरामात पूर्ण केलं. सनरायझर्सचा आणखी एक तरुण बॅट्समन अभिषेक शर्मानं (Abhishek Sharma) नाबाद 59 रन्स काढले. तर या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या प्रभसिमरननं 46 बॉल्समध्ये 4 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं नाबाद 73 रनची खेळी केली.
पंजाबच्या टीमनं याचबरोबर साखळी फेरीतील सलग चौथा विजय मिळवला आहे. त्यांनी या स्पर्धेत यापूर्वी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि रेल्वे या टीमचा पराभव केला आहे. या विजयाबरोबरच पंजाबनं बाद फेरीतील जागा जवळपास निश्चित केली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.