फोटो – ट्विटर/ Wisden

टीम इंडियाचा (Team India) ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) हा रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध आहे. मंकड रनआऊट (Mankad Run Out) असो अथवा भारत – ऑस्ट्रेलिया सीरिज अश्विन सर्व बाबतीत त्याची मतं स्पष्टपणे मांडतो. इतकचं नाही, तर टीम मीटिंगमध्ये त्याची मत मांडायचा फटका बसला असल्याचा आरोप सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केला होता.

( वाचा : Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )

आर. अश्विनचं स्वत:चं युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर वेगवेगळे आजी – माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक यांच्या मुलाखती तो घेत असतो. समोरच्याला कसं बोलतं करावं?, अभ्यासू प्रश्न कसे विचारावेत?  हे समजून घेण्यासाठी अश्विनच्या युट्यूब चॅनला सर्वांनी अभ्यास करायला हवा.

पुजाराला चॅलेंज!

आर. अश्विननं त्याच्या चॅनलवर नुकताच टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड (Vikaram Rathour) यांचा इंटरव्ह्यू घेतला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये त्यानं टीम इंडियाचा आधार असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या बॅटिंगबद्दल एक ओपन चॅलेंज दिलं आहे.

संयमी खेळासाठी प्रसिद्ध असलेला चेतेश्वर पुजारा हवेतून अगदी कमी शॉट खेळतो. त्याच्या बॅटिंगवर चर्चा करताना अश्विननं टीम इंडियाचे बॅटींग कोच राठोड यांना चॅलेंज दिलं. “राठोड यांनी पुजाराला भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजमध्ये स्पिनर्सच्या विरुद्ध पुढं येऊन खेळण्याचं चॅलेंज दिलं तर अर्धी मिशी साफ करेल.’’ असं अश्विननं चॅलेंज दिलं आहे.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : चेतेश्वर पुजारा, भारतीय टीमच्या भव्य इमारतीचे घावं सोसणारा पाया! )

राठोड यांचं उत्तर

टीम इंडियाच्या कोचनं यावर सांगितलं की, ते अनेक दिवसांपासून या विषयावर पुजाराचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पुजारानं त्यावर त्यांना अनेक कारणं दिली आहेत. त्यावर अश्विननं मजेत म्हणाला की, पुजारानं इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये मोईन अली किंवा अन्य कोणत्या स्पिनरला क्रिजच्या बाहेर येऊन शॉट मारला तर तो त्याची अर्धी मिशी कापेल, इतकचं नाही तर त्या अर्ध्या मिशीसह मॅच देखील खेळेल.
विक्रम राठोड यांनी देखील हे चॅलेंज अगदी मजेशीर असल्याचं म्हंटलं आहे. पुजारा हे चॅलेंज स्विकारेल अशी आशा, त्यांनी व्यक्त केली आहे.

संयमी पुजारा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये 3 हाफ सेंच्युरीसह 271 रन काढले. हे रन काढण्यासाठी त्यानं 928 बॉल खेळले. त्याचा ऑस्ट्रेलिया सीरिजमधील स्ट्राईक रेट 29.20 होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: