वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final 2021) टीम इंडियाचा मुख्य बॉलर आर. अश्विनवर (Ravichandran Ashwin) माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंट्रेटर संजय मांजेरकरनं (Sanjay Manjrekar) टीका केली आहे. मांजरेकरनं केलेल्या टीकेचे क्रिकेट विश्वात जोरदार पडसाद उमटले. त्यानंतरही मांजरेकर त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे. मांजरेकरनं एक ट्विट करत आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. मांजरेकरच्या या शेरेबाजीवर अखेर अश्विननं उत्तर (Ashwin on Manjrekar) दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

संजय मांजरेकरनं एका कार्यक्रमात बोलताना अश्विनच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केला होता. ‘अश्विन ‘ऑल टाईम ग्रेट’ आहे हा दावा आपल्याला मान्य नाही. याचे कारण म्हणजे SENA  (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) अश्विननं एकदाही एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या नाहीत. मायदेशात देखीस गेल्या 4 वर्षात रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) अश्विनच्या बरोबरीनं विकेट्स घेतल्या आहेत. तसंच नुकत्याच झालेल्या इंग्लंड सीरिजमध्ये अक्षर पटेलनं (Axar Patel) अश्विनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.’ असे मांजरेकरने म्हंटले होते.

जडेजानंतर अश्विनवर घसरला मांजरेकर, कारकिर्दीवर उपस्थित केला गंभीर प्रश्न

मांजरेकर वक्तव्यावर ठाम

संजय मांजरेकरच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले. याबाबत अनेकांनी मांजरेकरवर टीका केली. त्यानंतरही मांजरेकर या वक्तव्यावर ठाम आहे. मांजरेकरनं एक ट्विट करत त्याची बाजू मांडली.

‘ऑल टाईम ग्रेट’ ही उपाधी कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सन्मानाची गोष्ट आहे. डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे क्रिकेटपटू माझ्यासाठी ‘ऑल टाईम ग्रेट आहेत.’ अश्विनबद्दल मी पूर्ण आदर ठेवून हे सांगू इच्छितो की तो अजून ‘ऑल टाईम ग्रेट’ नाही.

अश्विनचे उत्तर

संजय मांजरेकरचे ट्विट पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की त्याने या ट्विटमध्ये एकाही बॉलरचा उल्लेख ‘ऑल टाईम ग्रेट’ म्हणून केलेला नाही. मांजरेकर सातत्याने बोलत असल्याने अखेर अश्विनला या प्रश्नावर उत्तर (Ashwin on Manjrekar) द्यावे लागले.

अश्विननं अपराचित या तामिळ सिनेमातील एक डायलॉग शेअर करत मांजरेकरला उत्तर दिले आहे. अपराचितमधील मेन हिरो विक्रम त्याचा मित्र विवेकला ‘असं बोलू नकोस, मला वेदना होतात.’ असं म्हणतो. तो डायलॉग अश्विननं पोस्ट केला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: