टीम इंडियासाठी मैदानात 100 नाही तर 200 टक्के देणारा क्रिकेटपटू अशी आर. अश्विनची (Ravichandran Ashwin) ओळख आहे.  टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप जिंकला त्या टीममधील अश्विन हा एक नवोदीत खेळाडू होता. त्याला त्या वर्ल्ड कपमध्ये फार संधी देखील मिळाली नव्हती. आज अश्विन भारतीय टीममधील सर्वात यशस्वी बॉलर आहे. त्याच्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध झालेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) ही खूप मोठी लढत होती. या पराभवानंतर त्याच्या मनाची अवस्था (Ashwin on WTC Final) अश्विननं YouTube चॅनलवर सांगितली आहे.

आमच्यासाठी मोठी मॅच होती

न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव करत टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद पटकावले. अश्विननं ही टेस्ट आमच्यासाठी खूप मोठी संधी होती, असं सांगितलं आहे. “साऊथम्पटन टेस्ट खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची होती. विशेषत: टेस्ट स्पेशालिस्ट आणि मागच्या वर्षी झालेला वर्ल्ड कप न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ही फायनल मोठी संधी होती. पण काही गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाहीत. मला वाटलं होतं, 6 व्या दिवसाचा काही उपयोग होणार नाही. पण तो दिवस उपयोगी ठरला. त्याच दिवशी मॅचचा निकाल लागला.”

विल्यमसनच्या टीमचं अभिनंदन

अश्विननं ही टेस्ट जिंकून वर्ल्ड़ टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद मिळणाऱ्या न्यूझीलंडचं अभिनंदन केलं आहे. “ते विजयासाठी पात्र होते. ते मॅचमध्ये शेवटपर्यंत होते. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले. इंग्लंड हे लगेच जाऊन भरपूर रन करावे आणि विकेट्स घ्याव्या अशी जागा नाही. आम्हाला आयपीएल स्पर्धेनंतर एक महिना ब्रेक होता. त्यानंतर आम्ही ही टेस्ट खेळलो. मला कोणतीही सबब सांगायची नाही. आम्ही आमच्यापरीनं प्रयत्न केले. पण मनासारखं घडलं नाही.” असे अश्विनं सांगितलं.

‘…तसं झालं तर क्रिकेट खेळणे सोडून देईन,’ अश्विनचं मोठं वक्तव्य

‘मला काहीच समजत नव्हतं’

अश्विननं पराभवानंतरचा वेदनादायी अनुभव सांगितला आहे. “मी मॅच संपल्यावर सून्न झालो होतो. आजूबाजूला काय घडत आहे, ते मला समजत नव्हते. अगदी शेवटच्या दिवशी देखील आम्ही मॅचमध्ये होतो याची मला खात्री होती. केन विल्यमसनच्या LBW चा बॉल ट्रॅकरमध्ये दिसला नाही, ते अनपेक्षित होते.

या पराभवानंतर फॅन्सनं निराश होणे स्वाभाविक आहे. लॉकडाऊन आणि अन्य घटनांमध्ये काही तरी चांगली बातमी येईल अशी कोट्यावधी फॅन्सची अपेक्षा होती. पण तसं घडलं नाही. आता आम्ही दुसरी एखादी आयसीसी ट्रॉफी जिंकू अशी आशा करुया,” असं  अश्विननं (Ashwin on WTC Final) यावेळी सांगितले.

‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य

“मॅच संपल्यानंतर न्यूझीलंडनं प्रथेप्रमाणे ट्रॉफीसोबत आणि ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन केले. ते मैदानात देखील आले होते. वरच्या मजल्यावरुन ते पाहणे हा वेगळाच अनुभव होता. त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत सेलिब्रेशन केले. युद्ध जिंकल्याच्या थाटात त्यांच्या आरोळ्या सुरु होत्या. हे सर्व आम्हाला करता आलं नाही, ही अस्वस्थ करणारी भावना होती,” असे अश्विनने (Ashwin on WTC Final) स्पष्ट केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: