टीम इंडियाच्या (Team India) बॅट्समन्सचे सध्या खराब दिवस सुरु आहेत. अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची दुसरी इनिंग 36 रन्सवर संपुष्टात आली. या लज्जास्पद कामगिरीमुळे बॅट्समन्सवर जोरदार टीका होता आहे. भारताचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा सध्या अनेकांच्या टीकेचा केंद्रबिंदू आहे.

पृथ्वी शॉ आयपीएल स्पर्धेपासून (IPL 2020) फॉर्मात नाही. अ‍ॅडलेड टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये तो शून्य तर दुसऱ्या इनिंगमध्ये चार रन्स काढून आऊट झाला. पृथ्वीचं फास्ट बॉलिंग खेळण्याचं सदोष तंत्र आता जगासमोर उघडं पडलं आहे. त्यामुळे दोन्ही इनिंगमध्ये त्याला फास्ट बॉलर्सनी बोल्ड केले. बॅटिंगमधील खराब फॉर्मचा पृथ्वीच्या फिल्डिंगवरही परिणाम होतोय. त्यामुळे पृथ्वी शॉ च्या जागेवर ओपनिंगला कुणाला खेळवायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यास बीसीसीआयने (BCCI) सुरुवात केली आहे.

( वाचा : ‘टीम इंडियाच्या मदतीसाठी तातडीनं द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवा’, माजी कॅप्टनचा सल्ला )

पृथ्वी शॉ ला पर्याय कोण?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या सीरिजसाठी शुभमन गिल (Shubman Gill) आणि के.एस. राहुल (KL Rahul) हे दोन पर्याय टीम इंडियाकडे आहेत. मात्र गिल आणि राहुल हे दोघेही टेस्ट क्रिकेट मधील मीडल ऑर्डरचे बॅट्समन असल्याने पृथ्वीला पर्याय हा स्पेशालिस्ट ओपनर असावा असा विचार सध्या सुरु आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीनुसार बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) सध्या कर्नाटकचा तरुण ओपनर देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) हा NCA चा संचालक आहे. द्रविडच्या विशेष मार्गदर्शनाखाली पडिक्कलची तयारी करुन घेतली जात आहे.

कोण आहे देवदत्त पडिक्कल?

आयपीएल 2020 (IPL 2020)  या स्पर्धेतून पडिक्कलचे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले. पडिक्कलने या आयपीएलमधील 15 मॅचमध्ये 473 रन्स काढले होते. यामध्ये पाच हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

त्याने आयपीएलपूर्वी सर्व प्रकारच्या देशांतर्गत स्पर्धेतस्वत:ला सिद्ध केले आहे. सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ सारख्या दिग्गजांनी त्याच्या खेळाची प्रशंसा केली आहे. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा शिल्पकार असलेल्या राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पडिक्कलच्या खेळाला आणखी पैलू पडतील हे नक्की

( वाचा : देवदत्त पडिक्कल : कर्नाटकचा युवा बॅट्समन बनला आयपीएलचा हिरो! )

2021 मध्ये करणार पदार्पण?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडची टीम चार टेस्टच्या दौऱ्यासाठी भारतातमध्ये येणार आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपची (ICC Test Championship) फायनल गाठण्यासाठी भारताला इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये पडिक्कलचा अतिरिक्त ओपनर म्हणून टीम इंडियामध्ये समावेश होऊ शकतो. 20 वर्षाच्या देवदत्तने यावर्षी आयपीएल गाजवले. तो आता या वर्षी टेस्ट क्रिकेट गाजवण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: