फोटो – ट्विटर/BCC-IPL

कोणत्याही क्रिकेटपटूला जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेण्यासाठी एखादी सीरिज किंवा एखाद्या मॅचची गरज असते. पण अवघ्या पाच बॉलमध्ये ज्या खेळाडूचं नशीब बदललं. फक्त पाच बॉलमध्ये त्यानं झिरो नंबर 1 ते हिरो नंबर 1 असा प्रवास केला. या पाच बॉलमुळे त्याच्या आत्मविश्वात भर पडली. त्याने नंतर संपूर्ण सीरिज गाजवली आणि त्याची टीम इंडियामध्ये निवड झााली. त्या खेळाडूचं नाव आहे, राहुल तेवातिया (Rahul Tewatia). राहुलचा आज वाढदिवस (Rahul Tewatia Birthday) आहे. आजच्या दिवशी ( 20 मे 1993) राहुलचा जन्म झाला. राहुलनं मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) पंजाब किंग्ज इलेव्हनच्या मॅचमध्ये राहुलनं सलग 5 सिक्स लगावले. त्यामुळे मिळालेल्या आत्मविश्वासानं संपूर्ण सिझन गाजवला. त्यामुळेच भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामधीलT20 सीरिजसाठी त्याची टीम इंडियात (Team India) निवड झाली होती.

पहिल्या लढतीत चुणूक

राजस्थानची पहिली लढत चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोबत होती. इतिहास सीएसकेच्या बाजूने होता. मुंबई इंडियन्सला पराभूत करत सीएसकेने स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती. संजू सॅमसनच्या (Sanju Samson) फटकेबाजीने राजस्थानने 216 रन्स काढले. शारजाच्या छोट्या आणि पाटा पिचवर हे टार्गेट सेफ नव्हतं. त्या मॅचमध्ये तेवतियाने सॅम करन, ऋतूराज गायकवाड आणि केदार जाधव या मिडल ऑर्डरच्या बॅट्समन्सना आऊट करत सीएसकेची गाडी पंक्चर केली.

पंजाबविरुद्ध हिरोची एन्ट्री!

राहुल तेवतियाच्या आजवरच्या करियरला कलटाणी देणारा प्रसंग पुढच्या मॅचमध्ये आला. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध (KXIP) 11 ओव्हर्समध्ये 124 रन्स हवे असताना तेवतियाला चौथ्या क्रमांकावर बढती देऊन पाठवण्यात आले.त्याच्या फटकेबाजीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये चर्चा आहे. नेट प्रॅक्टिसमध्येही त्याने टीम मॅनेजमेंटला प्रभावित केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रवी बिश्नोई आणि एम. अश्विन या पंजाबच्या लेगस्पिनरच्या विरुद्ध तो राजस्थानकडे एकमेव डावखुरा फलंदाज होता.

( वाचा : IND vs AUS : असा घडला ब्रिस्बेन टेस्टचा हिरो ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर! )

तेवतिया येताच के.एल. राहुलने ग्लेन मॅक्सवेल या ऑफ स्पिनरच्या हातात बॉल दिला. संजू सॅमसन पूर्ण भरात होता. तेवतिया मात्र फसला होता. एखादा बॅट्समन फसला की त्याचा परिणाम संपूर्ण इनिंगवर होता. तो रन काढत तर नाहीच पण आऊटही लवकर होत नाही.

इंग्लंडमध्ये 2009 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 35 बॉलमध्ये 25 रन्स. 2014 च्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये युवराज सिंहचे (Yuvraj Singh) 21 बॉलमध्ये 10 रन ही याची प्रमुख उदाहरणं. अगदी अलीकडच्या काळात 2019 च्या आयपीएलमध्ये केकेआरला मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय आवश्यक असताना रॉबीन उथप्पाने रडतखडत 47 बॉलमध्ये 40 रन काढले होते. तेवतिया (Rahul Tewatia त्याच मोडमध्ये गेला होता.

सोशल मीडियावर तेवतियाचं ट्रोलिंग सुरु झालं. त्याच्यावरचे मिम्स फिरु लागले. संथ खेळणा-या बॅट्समनला ‘रिटायर हर्ट’ करा अशी मागणी माजी क्रिकेटपटूंकडून होऊ लागली. राजस्थानच्या मॅनेजमेंटच्या चेह-यावर ‘चिंतेचे वाळवंट’ तयार झाले होते. राजस्थान – पंजाब – दिल्ली आणि पुन्हा राजस्थान असा आयपीएल प्रवास करणा-या राहुल तेवतियाचं संपूर्ण करियर पणाला लागलं होतं.

बॉक्सिंगच्या मॅचमध्ये आठ राऊंड सतत मार खाणारा बॉक्सर नवव्या राउंडमध्ये जिद्दीनं उठतो आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला ‘नॉक आऊट’ पंच मारतो असे प्रसंग सिनेमात हमखास असतात. आठ ओव्हर्स चाचपडत खेळणा-या तेवातियाने नवव्या ओव्हरमध्ये शेल्डन कॉट्रेलला (Sheldon Cottrell) असाच ‘नॉकआऊट पंच’ मारला. त्याच्या एका ओव्हरमध्ये पाच सिक्सर लगावले!!!!!

( वाचा : देश आधी की IPL ? शाकीब आणि रबाडा यांचं काय ठरलंय ते वाचा )

राशिद खानवर हल्लाबोल!

राहुल तेवतियाचा या इनिंगनंतर (Rahul Tewatia Birthday) आत्मविश्वास कमालीचा वाढला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धची त्याची इनिंग अधिक नियोजनबद्व होती. ग्राऊंड मोठं होतं. बॉलर्स फॉर्मात होते. राशिद खानचे (Rashid Khan) जादूचे प्रयोग सुरु झाले होते.

तेवतियाने या संकटसमयी स्वत:वरचा विश्वास ढळू दिला नाही. त्याने स्वत:ला बॅक केले. त्याचा जोडीदार रियान परागलाही मार्गदर्शन केले. पिचचा योग्य अंदाज केला.सुरुवातीला मोठे फटके न मारता धावफलक हलता ठेवला. स्ट्राईक सतत रोटेट केली. प्रतिहल्ला करण्यासाठी योग्य बॉलरची वाट पाहिली. जम बसल्यानंतर राशिद खानलाही सलग तीन फोर मारले. थोडक्यात ज्या गोष्टीसाठी महेंद्रसिंह धोनी ओळखला जातो. ज्या गोष्टी वारंवार केल्याने महेंद्रसिंह धोनी मोठा झाला त्या सर्व गोष्टी सनरायझर्स विरुद्ध तेवतियाने केल्या.

तेवतियाला हरयाणाच्या नेटमध्ये यजुवेंद्र चहल – अमित मिश्रा – जयंत यादव या फिरकी त्रिकूटाला खेळण्याचा मोठा अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा त्याला राशिद खान विरुद्ध झाला.

गुन्हेगारी दलदलीतून तयार झाला चॅम्पियन पोलार्ड

मनासारख्या गोष्टी घडत नसतील तरी तोल ढळू द्यायचा नाही. मैदानात घट्ट उभं राहायचं. संधी मिळेपर्यंत वाट पाहायची. संधी मिळाली की सोनं करायचं. राहुल तेवतिया हीच तर शिकवण मागच्या वर्षी राहुल तेवतिया (Rahul Tewatia Birthday) नं सर्वांना दिली. राहुलला इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यातून खराब फिटनेसमुळे माघार घ्यावी लागली. यावर्षी झालेल्या आयपीएलमधील मॅचमध्ये (IPL 2021) राहुलचा मॅच विनिंग खेळ दिसला नाही, पण राहुलला संधी मिळेपर्यंत घट्ट पाय रोवून मैदानात उभं राहयचं माहिती आहे. त्याची हीच ट्रेनिंग त्याला 2020 किंवा 2021 नाही तर आयुष्यातील कोणत्याही वर्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: