
नवा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्त्वाखाली भरारी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) मोठा धक्का बसला आहे. त्यांचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स आयपीएलमधून आऊट (Ben Stokes) झाला आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये स्टोक्सच्या हाताला दुखापत झाली असून त्यामुळे त्याला आता पुढील आयपीएल स्पर्धा खेळता येणार नाही.
‘इंडिपेंडंट’ या ब्रिटीश माध्यमानं सर्वात प्रथम हे वृत्त दिलं आहे. राजस्थान रॉयल्सनं देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘स्टोक्स हाताला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही. पण तो आमच्या टीमसमोबत उर्वरित आयपीएल स्पर्धेत राहणार असू टीमला ऑफ फिल्ड मदत करणार आहे. या दरम्यानच्या काळात स्टोक्सचा बदली खेळाडू शोध फ्रँचायझी करणार असल्याचं ‘राजस्थान रॉयल्स’ नं स्पष्ट केलं आहे.
कधी झाली दुखापत?
पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये बेन स्टोक्सनं ख्रिस गेलचा कॅच पकडला त्यावेळी त्याच्या हाताला दुखापत झाली. पंजाबच्या इनिंगमधील दहाव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या कॅचनंतर स्टोक्स काही काळ ‘डग आऊट’ मध्ये गेला होता. त्यानंतर ओपनिंगला आलेला स्टोक्स शून्यावरच आऊट झाला.
आर्चरच्या अनुपस्थितीमुळे राजस्थान त्रस्त
राजस्थान रॉयल्स सध्या त्यांचा प्रमुख बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याच्या दुखीपतीमुळे त्रस्त आहे. आर्चरच्या हाताचं ऑपरेशन झालं असून त्यामुळे तो अजून आयपीएलसाठी दाखल झालेला नाही. आर्चरनं मंगळवारपासून ट्रेनिंग सुरु केलं आहे. त्यामुळे तो आगामी काळात राजस्थानच्या टीममध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
स्टोक्सची कारकीर्द
जागतिक क्रिकेटमधील अव्वल ऑल राऊंडर म्हणून बेन स्टोक्स ओळखला जातो. स्टोक्सनं आयपीएलमध्ये 43 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 25.55 च्या सरासरीनं 920 रन काढले आहेत. स्टोक्सचा स्ट्राईक रेट 134.50 असून 107 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. स्टोक्सनं आयपीएलमध्ये आजवर दोन सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी लगावल्या आहेत.
स्टोक्सनं 43 मॅचमध्ये 8.55 च्या इकॉनॉमी रेटनं 28 विकेट्स घेतल्या आहेत. मागील आयपीएलमध्ये स्टोक्स वडिलांच्या खराब तब्येतीमुळे पूर्वार्धात खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्यानं दुसऱ्या हाफमध्ये राजस्थानसाठी ओपनरची भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पडली होती. स्टोक्स स्पर्धेतून आऊट झाल्यानं त्याची कमतरता भरुन काढण्याचं आव्हान संजू सॅमसनच्या टीम समोर असणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.