फोटो – ट्विटर

कोरोना व्हायरसच्या अडथळ्याचा फटका बसलेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022) स्पर्धा अखेर सुरू झाली आहे. यावर्षी ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा आता महिनाभर चालणार असून दुसरा टप्पा आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2022) होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) सेंच्युरी झळकावली. त्याचबरोबर अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) यानेही दमदार पदार्पण केले. अनुभवी अजिंक्य आणि नवोदीत यशनं (Ajinkya Rahane, Yash Dhull) रणजी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला.

‘यश’स्वी सुरूवात

दिल्ली विरूद्ध तामिळनाडू (Delhi vs Tamilnadu) या देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज टीममधील लढत 19 वर्षांच्या यशनं गाजवली. यश अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या (U19 World Cup 2022) टीमचा कॅप्टन आहे. त्याने सेमी फायनलमध्ये दमदार सेंच्युरी झळकावली होती. त्या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याला दिल्लीकडून रणजी स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळाली.

यशनं त्याचा फॉर्म या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीही कायम ठेवला. तो दिल्लीकडून ओपनिंगला उतरला. दिल्लीची अवस्था 2 आऊट 7 अशी नाजूक झाली होती. त्यानंतरही तो डगमगला नाही. त्याने तामिळनाडू विरूद्ध 57 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर 133 बॉलमध्ये सेंच्युरी (Ajinkya Rahane, Yash Dhull) झळकावली.

गुवाहाटीमधील मॅचमध्ये यशनं लंचनंतर त्याची सेंच्युरी पूर्ण केली. रणजी पदार्पणात सेंच्युरी करणाऱ्या सचिन तेंडुलकर, अमोल मुजूमदार, रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गजांच्या गटात यशनं जागा मिळवली आहे. अंडर 19 वर्ल्ड कप विजेतेपदानंतर महिनाभराच्या आत त्याने ही ‘यश’स्वी भरारी घेतली आहे. यशच्या सेंच्युरीमुळे दिल्लीनं पहिल्या दिवस अखेर 7 आऊट 291 पर्यंत मजल मारली.

बस ड्रायव्हरचा मुलगा ते फर्स्ट क्लास क्रिकेटचा सचिन तेंडुलकर!

अजिंक्यचा दमदार संदेश

तरूण यश ढूलप्रमाणेच अनुभवी अजिंक्य रहाणेसाठी  देखील आजचा दिवस खास (Ajinkya Rahane, Yash Dhull) ठरला. टेस्ट टीमचा माजी व्हाईस कॅप्टन असलेल्या अजिंक्यची टीम इंडियातील जागा धोक्यात आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खराब फॉर्म हे त्याचे मुख्य कारण आहे. अजिंक्यला टीममध्ये जागा मिळवण्यासाठी रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागेल अशी सूचना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केली आहे.

अजिंक्यनं रणजी सिझनच्या पहिल्याच दिवशी या सुचनेप्रमाणे खेळ केला. अजिंक्यच्या मुंबई टीमची लढत चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) सौराष्ट्राशी सुरू आहे. या मॅचच्या (Mumbai vs Saurashtra) पहिल्या दिवशी अजिंक्यनं नाबाद सेंच्युरी झळकावली.

पुजारा-रहाणेची टीममधील हकालपट्टी निश्चित, सौरव गांगुलीनं दिले स्पष्ट संकेत

अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या मॅचमध्ये मुंबईची सुरूवात खराब झाली. कॅप्टन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) फक्त 1 रन काढून आऊट झाला. मुंबईच्या पहिल्या 3 विकेट झटपट गेल्या. त्यानंतर फॉर्मच्या शोधात असलेल्या अजिंक्यला सर्फराज खाननं (Sarfaraz Khan) दमदार साथ दिली.

अजिंक्यनं 211 बॉलमध्ये 14 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 36 वी सेंच्युरी पूर्ण केली. सर्फराजनं ही सेंच्युरी झळकावली. पहिल्या दिवसाच्या अखेरिस अजिंक्य 108 आणि सर्फराज 119 रनवर नाबाद असून मुंबईनं 3 आऊट 263 अशी मजबूत सुरूवात केली आहे. श्रीलंका विरूद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड लवकरच होणीर आहे. या टीममध्ये जागा मिळवण्यासाठी अजिंक्यनं दावेदारी (Ajinkya Rahane, Yash Dhull) सादर केली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: