फोटो – ट्विटर

रणजी ट्रॉफीच्या नव्या सिझनची (Ranji Trophy 2022) सुरूवात ऐतिहासिक घटनेनं झाली आहे. ही घटना या स्पर्धेच्या 88 वर्षांच्या इतिहासात फक्त तिसऱ्यांदा घडली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी या ऐतिहासिक घटनेचा पहिला अंक पार पडला. पहिल्या मॅचच्या शेवटच्या दिवशी हा इतिहास घडला आहे. अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) विजेत्या टीमचा कॅप्टन यश ढूलचा या ऐतिहासिक घटनेचा हिरो (Yash Dhull Record) आहे.

पदार्पणातील बॉस

यशने वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप विजेतेपदानंतर काही दिवसांनीच जगाच्या दुसऱ्या भागात गुवाहाटीमध्ये हा इतिहास रचला आहे. त्याने दिल्लीकडून रणजी स्पर्धेत पदार्पण केले. तामिळनाडू विरूद्धच्या मॅचमध्ये (Delhi vs Tamil Nadu) पहिल्याच दिवशी यशनं दमदार सेंच्युरी झळकावली.

यश दिल्लीकडून ओपनिंगला उतरला होता. दिल्लीची सुरूवात 2 आऊट 7 अशी खराब झाली. त्यानंतर ती 3 आऊट 67 झाली. टॉप ऑर्डरमधील प्रमुख 3 बॅटर आऊट झाल्यानंतरही यशनं हिंमत सिंह सोबत महत्त्वाची पार्टनरशिप करत क्रिकेटमधील कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळण्याची आपल्यात हिंमत असल्याचे सिद्ध केले.

यशनं पहिल्या इनिंगमध्ये 150 बॉलमध्ये 113 रन (Yash Dhull Record) केले. या खेळीत त्याने 18 फोर लगावले. यशची नवी टीम दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सहकारी ललित यादवनं 177 रन केल्यानं दिल्लीनं पहिल्या इनिंगमध्ये 452 रन केले.

शाहरूखचा आणखी एक सुपरहिट शो

दिल्लीच्या 452 रनचा पाठलाग करता तामिळनाडूची अवस्था 5 आऊट 162 झाली होती. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) मोठी किंमत मिळालेल्या शाहरूख खाननं (Shahrukh Khan) या अडचणीतून दिल्लीला वाचवले. त्याने बाबा अपराजित (117) सोबत सहाव्या विकेटसाठी 134 रनची पार्टनरशिप केली. शाहरूखनं त्याची रणजी ट्रॉफीमधील पहिली सेंच्युरी फक्त 89 बॉलमध्ये पूर्ण केली.

शाहरूखला या सेंच्युरीचं रूपांतर डबल सेंच्युरीमध्ये करण्यात फक्त 6 रन कमी पडले. त्याने 148 बॉलमध्ये 20 फोर आणि 10 सिक्ससह 194 रन काढले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या या सुपरहिट शोमुळे तामिळनाडूला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी मिळाली. तामिळनाडूनं पहिल्या इनिंगमध्ये 494 रन केले.

टीम निवडीत 2 जणांवर अन्याय, देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीला BCCI चा ठेंगा

यशचा रेकॉर्ड

दिल्ली विरूद्ध तामिळनाडू मॅचच्या शेवटच्या दिवशी यशनं रेकॉर्ड केला. त्याने दुसऱ्या इनिंगमध्येही सेंच्युरी झळकावली. यश आणि ध्रुव शौर्य यांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद 228 रनची पार्टनरशिप केली. ध्रुव 107 तर यश 113 रन काढून नाबाद राहिले. ही मॅच अखेर ड्रॉ झाली. मॅच ड्रॉ झाली असली तरी यामध्ये इतिहास घडला आहे.

रणजी स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात पदार्पणातील मॅचमधील दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा यश हा फक्त तिसरा बॅटर (Yash Dhull Record) आहे. यापूर्वी 1952-53 मधील सिझनमध्ये गुजरातचे नरी कॉन्ट्रॅक्टर (152 आणि 102) तर 2012-13 मधील सिझनमध्ये महाराष्ट्राच्या विराग आवटेनं (126 आणि 112) हा रेकॉर्ड केला होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: