फोटो – ट्विटर, मनोज तिवारी

गतवर्षी कोरोनाच्या कचाट्यात सापडेली रणजी ट्रॉफी स्पर्धा यंदा 13 जानेवारी ते 17 मार्चदरम्यान रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश या मॅचने स्पर्धेचा शुभारंभ होईल. या स्पर्धेसाठी बंगालने आपल्या 21 सदस्यीस टीमची घोषणा (Bengal Squad) केली आहे. अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे टीमचे कॅप्टनपद देण्यात आले आहे. मात्र या टीममधील एक नाव सर्वांनाच अचंबित करणारे आहे. क्रीडामंंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwary Ranji Trophy) यांची बंगालच्या रणजी टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

कमबॅकसाठी सज्ज

बंगालने आपल्या टीममध्ये राज्याचे क्रीडामंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwary Ranji Trophy) यांनाही स्थान दिले आहे. राजकारणामध्ये ए्ट्री केल्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करण्यासाठी मनोज तिवारी सज्ज आहे. क्रिकेट इतिहासामध्ये एखाद्या क्रीडामंत्र्यांची रणजी टीममध्ये निवड होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.

36 वर्षीय मनोज तिवारी यांनी बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMS) प्रवेश केला होता. शिबपूर मतदारसंघातून तिवारी यांना टीएमसीने मैदानात उतरवले होते. तिवारी यांनी भाजपच्या रतिन चक्रवर्ती यांनी 6000 हून अधिक मतांनी पराभव केला होता. या विजयानंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये तिवारी यांना क्रीडामंत्री करण्यात आले.

17 वे वर्ष

रणजी स्पर्धा खेळण्याचे मनोज तिवारी (Manoj Tiwary Ranji Trophy) यांचे यंदा 17 वे वर्ष आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेत उतरलेल्या तिवारी यांनी फर्स्ट क्लासच्या 119 मॅच खेळल्या असून यात 8752 रन केल्या आहेत. 27 सेंच्युरी आणि 35 हाफ सेंच्युरीचा यात समावेश आहे.

केळं खाऊन वर्ल्डकपमध्ये 6 विकेट्स घेणारा अहमदाबादचा कोच!

टीम इंडियाकडून खेळलेल्या तिवारी यांनी 2006-07 रणजी सिझन गाजवला होता. या सिझनमध्ये तिवारी सर्वोच्च फॉर्मात होता. संपूर्ण सिझनमध्ये तिवारी यांनी 99.50 च्या शानदार एव्हरेजने 796 रन चोपल्या होत्या.

टीम इंडियाचे प्रतिनिधित्व

मनोज तिवारीने टीम इंडियाचेही प्रतिनिधित्व केले आहे. 12 वन डे आणि 3 T20 लढती तिवारीने खेळल्या आहेत. वन डे मध्ये एक सेंच्युरीचीही नोंद तिवारीच्या नावापुढे आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स), कोलकाता नाईट रायडर्स, रायझींग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्ह पंजाब या टीमकडून तिवारी आयपीएल खेळला.

कोरोनाचे संकट

दरम्यान, मनोज तिवारी बंगालच्या टीमचे माजी कॅप्टन (Manoj Tiwary Ranji Trophy) आहेत. बंगालची टीम यंदा राजस्थान, केळ, हरियाण आणि त्रिपुरासोबत टीम ग्रुप बीमध्ये असून 13 जानेवारीला त्रिपुरासोबत पहिली मॅच खेळले. परंतु तत्पूर्वी बंगालला धक्का बसलाअसून 6 प्लेअर्सला कोरोनाची लागण झाली आहे. सुदीप चटर्जी, अनुष्टुप मजूमदार, काजी जुनैद सैफी, गीत पुरी आणि प्रदीप्त प्रमाणिक यांना कोरोना झाला असून टीमचे असिस्टंट कोचही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत.

निरोपाची वेळ झाली! वर्ल्ड क्रिकेटमधील ‘हे’ दिग्गज 2022 मध्ये घेणार निवृत्ती

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: