फोटो – Wikipedia

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) या वर्षापासून दर महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्याचा पहिला पुरस्कार ऋषभ पंत (Rishabh Pant) याला देण्यात आला होता. आता फेब्रुवारी महिन्यातही भारतीय खेळाडूनंच यामध्ये बाजी मारली आहे. इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज ऑल राऊंड कामगिरीनं गाजवणाऱ्या आर.अश्विनला (Ashwin ICC Award) यंदाचा ICC Player of The Month हा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Ravichandran Ashwin won the Men’s ICC Player of the month award for February.)

इंग्लंड विरुद्ध फेब्रुवारी महिन्यात झालेल्या तीन टेस्टमध्ये अश्विननं एका सेंच्युरीसह 176 रन काढले. तसंच 24 विकेट्स घेतल्या. याच कालावधीमध्ये अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा देखील पूर्ण केला. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हा टप्पा जलदगतीनं पूर्ण करणारा अश्विन हा मुरलीधरननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर आहे. टीम इंडियाला (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) मध्ये पोहचवण्यात अश्विनची भूमिका निर्णयाक ठरली. या कामगिरीमुळेच अश्विनला आयसीसीनं हा पुरस्कार (Ashwin ICC Award) जाहीर केला आहे.

अश्विननं इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root)  याला मागं टाकत हा पुरस्कार पटकावला आहे. जो रुटनं भारताविरुद्ध चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावली होती. रुटला जानेवारी महिन्यातही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र त्यावेळी भारताच्याच ऋषभ पंतनं त्याला मागे टाकून हा पुरस्कार पटकावला होता.

( वाचा : ‘या’ दोन जबरदस्त खेळीमुळे ऋषभ पंत ठरला पहिला ‘ICC Player of the month’ )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: