टीम इंडियाचा ऑल राऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहे. 2018 साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यामध्येच जडेजाने टीम इंडियात कमबॅक केले, आणि टीममधील जागा निश्चित केली. आता तीन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये सुरुवातीला होणारी वर्ल्ड टेस्ट सीरिजची फायनल (WTC Final) ही जडेजासाठी वर्ल्ड कप सेमी फायनलमधील न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. ‘त्या’ सेमी फायनलमध्ये हाफ सेंच्युरीनंतर केलेली तलवारबाजी ही टीव्ही कॉमेंट्रेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यासाठीच होती, हे जडेजाने (Jadeja on Manjrekar) स्पष्ट केले आहे.   

काय घडले प्रकरण?

टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल नकारात्मक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेला माजी कसोटीपटू आणि टीव्ही कॉमेंट्रेटर संजय मांजरेकर याने या वादाला सुरुवात केली होती. वर्ल्ड कप सेमी फायनलपूर्वी (Cricket World Cup 2019) मांजरेकरने काहीही कारण नसताना रवींद्र जडेजाच्या ऑलराऊंडर क्षमतेवर शंका उपस्थित केली होती. तो टीमसाठी लहान-लहान योगदान देणारा ‘bits and pieces player’ आहे, असे ट्विट केले होते.

मांजरेकरने ट्विटरचा वापर आपल्यावर चिखलफेक करण्यासाठी केल्याने जडेजा दुखावला होता. त्याने सुरुवातीला तातडीने ट्विटरवरच मांजरेकरला उत्तर दिले. ‘मी तुमच्यापेक्षा दुप्पट मॅच खेळलो आहे. अजूनही खेळत आहे. त्यामुळे तुम्ही खेळाडूचा आदर करा, आणि तुमची बकवास बंद करा.’ (‘verbal diarrhoea’) असे जडेजाने मांजरेकरला (Jadeja on Manjrekar) सुनावले होते.

आता जडेजा काय म्हणाला?

जडेजाने ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमधील घटनेवर थेट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर केलेल्या तलवारबाजीवर जडेजा म्हणाला, ‘त्यावेळी भाता गरम होता. मी कॉमेंट्री बॉक्स शोधत होतो. त्यानंतर मी विचार केला तो दुसरिकडे कुठे असेल. समजदार लोकांना कळालेच असेल मी ते सेलिब्रेशन कुणासाठी करत होतो.’ या शब्दात जडेजाने त्या विषयावर प्रतिक्रिया दिली.

सेमी फायनलमध्ये केला जबरदस्त खेळ

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (World Cup 2019) रवींद्र जडेजाने जबरदस्त खेळ करत टीम इंडियाला विजयाच्या जवळ आणले होते. 240 रनचा पाठलाग करत असताना टीम इंडियाची 30 व्या ओव्हरमध्ये 6 आऊट 92 अशी अवस्था झाली होती. त्यावेळी जडेजा मैदानात उतरला.

जडेजाने त्यानंतर जिद्दीनं खेळ करत 59 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 77 रन काढले. जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने सातव्या विकेटसाठी 116 रनची पार्टरनरशिप केली. त्यावेळी जोडी टीम इंडियाला फायनलमध्ये नेईल, अशी भारतीय फॅन्सना आशा वाटत होती. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. आधी जडेजा आणि नंतर धोनी आऊट झाला आणि टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये 18 रनने पराभव झाला.

चिते की चाल, बाज़ की नजर और जडेजा का थ्रो… पाहा VIDEO

या खेळीपूर्वी ‘bits and pieces player’ असं मांजरेकरनी ज्याचं वर्णन केलं होतं त्या जडेजाने बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही टीमसाठी योगदान दिले होते. त्याने दोन कॅच घेतले. एकाला रन आऊट केले त्याचबरोबर 10 ओव्हरमध्ये फक्त 34 रन देत 1 विकेटही घेतली होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading