फोटो – ट्विटर /@imjadeja

विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या टेस्टनंतर घरी परतला तेंव्हा त्याच्या जागेवर मेलबर्न टेस्टमध्ये रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) निवड होईल अशी खूप कमी जणांनी कल्पना केली असेल. टीम इंडियाला एका ऑल राऊंडरची गरज होती. जडेजाच्या सुधारलेल्या बॅटिंग स्कीलवर टीम मॅनेजमेंटचा विश्वास होता म्हणून त्याची टीममध्ये थेट विराटच्या ऐवजी निवड करण्यात आली.

अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराट-रहाणे (Ajinkya Rahane) जोडी फुटल्यानंतर टीम इंडियाची लोअर ऑर्डर कोसळली होती. मेलबर्नमध्ये रवींद्र जडेजानं कॅप्टन अजिंक्य रहाणेसोबत 6 विकेटसाठी 121 रन्सची पार्टरनरशिप केली. याच पार्टनरशिपच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियावर 131 रन्सची आघाडी घेतली. बॅटिंग प्रमाणेच फिल्डिंग आणि बॉलिंगमध्येही जडेजानं त्याचं काम चोख करत टीमच्या ऐतिहासिक विजयात त्याचा वाटा उचलला.

( वाचा : IND vs AUS – ‘हे’ आहेत मेलबर्नमधील टीम इंडियाच्या विजयाचे हिरो! )

विराट, धोनी नंतर जडेजा!

मेलबर्न टेस्ट ही रवींद्र जडेजासाठी आणखी एका गोष्टीसाठी खास ठरली. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहलीनंतर टीम इंडियाकडून (Team India) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये 50 मॅच खेळणारा जडेजा हा तिसराच भारतीय बनला आहे.

जडेजानं एक ट्विट करत हा आनंद सर्वांशी शेअर केला आहे. ‘’ज्यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत असे माही भाई आणि विराटच्या सोबत सन्मान मिळणे ही मोठी गोष्ट आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल BCCI, माझे सहकारी आणि सहकारी स्टाफ या सर्वांचे आभार. ही कामगिरी अशीच पुढे सुरु राहील अशी आशा आहे. जय हिंद,’’  असं ट्विट जडेजानं केलं आहे.

जडेजानं आजवर 50 टेस्ट, 50 आंतरराष्ट्रीय T20 आणि 168 वन-डे खेळल्या आहेत. बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून जडेजानं टीम इंडियात 2009 साली पदार्पण केले होते. मागील 11 वर्षांमध्ये जडेजानं टेस्टमध्ये 1926, वन-डे मध्ये 2411 तर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 217 रन्स केले आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यानं आजवर अनुक्रमे 216,188 आणि 39 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑल राऊंडर जडेजा *

एकूणरन्सविकेट्स
टेस्ट501926216
वन-डे1682411188
T205021739

( वाचा : Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )

* बातमीतील चार्टमध्ये वापरण्यात आलेली आकडेवारी ही 30 डिसेंबर 2020 पर्यंतची आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: