फोटो – ट्विटर

विराट कोहलीनं T20 टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर (Virat Kohli Steps down from T20 Captaincy) जे अंदाज बांधले जात होते, त्याच दिशेच्या बातम्या येत आहेत. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियामध्ये फूट पडल्याची बातमी समोर येत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) झालेल्या पराभवानंतर कमीत कमी दोन सिनिअर खेळाडूंनी विराट कोहलीच्या वागणुकीची बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार (Revolt In Team India) केली होती, असं वृत्त ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलं आहे.

कुणी केली विराटची तक्रार?

या वृत्तानुसार ‘टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहचली तेव्हा परिस्थिती सामान्य होती. पण, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं भारतीय टीमचा पराभव केल्यानंतर वातावरण बदललं. या फायनलमध्ये भारतीय बॅटर्सनं निराशा केली होती. त्यावेळी विराट कोहलीनं थेट त्यांच्यावर टीका केली होती.

या पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला होता की, ‘बॅटरची मानसिकता ही रन काढण्याची आणि रन काढण्याच्या पद्धती शोधण्याची हवी. तुम्ही आऊट होण्याची अतिरेकी काळजी करायला नको. त्यामुळे बॉलर्सना वरचढ होण्याची संधी मिळते.’ विराटचा हा इशारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यावर होता.  

WTC Final 2021: टीम इंडियाच्या पराभवाची 5 मुख्य कारणं

या विषयावर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार WTC Final मधील पराभवानंतर विराट कोहलीनं ड्रेसिंग रूममध्ये देखील पुजारा आणि रहाणेच्या खेळावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानं पुजाराचा स्लो स्ट्राईक रेट आणि रहाणेच्या फॉर्मवर प्रश्न विचारले होते. विराटच्या या भूमिकेनंतर टीममधील वातावरण बदललं. WTC Final नंतर टीम इंडियाला ब्रेक होता. यावेळी 2 सिनिअर बॅटर्सनी बीसीसीआय सचिव जय शहा यांना फोन करुन विराटची तक्रार केली. त्यानंतर बीसीसीआयला हा तणाव (Revolt In Team India) निवळण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.

विराटची आणखी एक कॅप्टनसी जाणार?

पुजारा आणि रहाणे यांनी फोन केल्यानंतर बीसीसीआयनं अन्य खेळाडूंकडून देखील फिडबॅक घेतला. तसंच इंग्लंड दौरा संपल्यानंतर या विषयावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर इंग्लंड दौरा संपल्यानंतर विराटनं आगामी T20 वर्ल्ड कपनंतर T20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली कॅप्टनसी सोडणार, T20 वर्ल्ड कपनंतर कमी करणार जबाबदारी

विराटनं सध्या T20 टीमची कॅप्टनसी सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र त्याचबरोबर तो वर्ल्ड कपनंतर वन-डे टीमची कॅप्टनसी देखील सोडण्याची दाट शक्यता आहे. T20 आणि वन-डे टीममध्ये फार फरक नाही. त्यामुळे या दोन टीमसाठी दोन वेगळे कॅप्टन नको असं मत व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे विराटला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या दौऱ्यापूर्वी वन-डे टीमची कॅप्टनसी सोडण्याची सूचनाही (Revolt In Team India) केली जाऊ शकते. या दोन्ही प्रकरात विराटचा वारसदार म्हणून रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव आघाडीवर आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: