फोटो – सोशल मीडिया

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहण्याकडे डोळे लावून बसलेल्या फॅन्ससाठी निराशाजनक बातमी आहे. मार्च महिन्याच होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) सचिन सहभागी होणार नाही. सचिन तेंडुलकर या स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये इंडिया लिजेंड्स (India Legends) टीमचा कॅप्टन तसेच स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता. सचिन या स्पर्धेतील दुसऱ्या सिझनमध्ये न खेळण्याचे कारण, आर्थिक असल्याचे (Payment Controversy) उघड झाले आहे.

नेमके काय घडले?

या प्रकरणात उघड झालेल्या माहितीनुसार सचिनसह अनेक खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निश्चित झालेली रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे सचिनने आगामी सिझनमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना करार केल्यानंतर 10 टक्के रक्कम देण्यात आली होती. 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत 40 टक्के आणि उर्वरित 50 टक्के रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत देण्यात येणार होती, पण ही रक्कम मिळण्यास विलंब झाला आहे. सचिनसह अनेक विदेशी खेळाडूंना ही रक्कम मिळाली नसल्याची माहिती, पीटीआयने सूत्रांच्या आधारे दिली आहे. याच कारणामुळे सचिननं या स्पर्धेत खेळण्यास नकार (Payment Controversy) दिला आहे.

या प्रकरणात बांगलादेशच्या मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार सचिनसह खालिद महमूद ‘सुजोन’, खालिद मशूद ‘पायलट’, मेहराब हुसेन, राजिन सालेह, हन्नान सरकार आणि नफीस इक्बाल या बांगलादेशच्या खेळाडूंनाही आयोजकांकडून पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही.

हार्दिक पांड्याचा पगार वाढला, अहमदाबाद टीमचे 3 खेळाडू निश्चित

यूएईमध्ये होणार सिझन

रस्ते सुरक्षा बाबात जागृती करणाऱ्या या सिझनचे आयोजन सर्वप्रथम 2020 मध्ये करण्यात आले होते. मात्र त्यावेळी देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर मागच्या वर्षी उर्वरित स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेतील निवृत्त क्रिकेटपटू सहभागी झाले होते.

सचिनच्या इंडिया लिजेंड्स टीमनं श्रीलंका लिजेंड्सला फायनलमध्ये हरवून ही स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेचा पुढील सिझन 1 मार्च ते 19 मार्च दरम्यान यूएईमध्ये होणा आहे, त्यापूर्वी सचिननं स्पर्धेतून माघार घेतल्यानं (Payment Controversy) स्पर्धेच्या भवितव्याला धक्का बसला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: