फोटो – बीसीसीआय

रोहित शर्मा आता टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन (Rohit Sharma named India’s Test Captain) झाला आहे. दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टेस्ट सीरिजमधील पराभवानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) कॅप्टनपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागेवर रोहितची नियुक्ती झाली आहे. आगामी भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) टेस्ट सीरिजपासून रोहित कॅप्टन असेल. रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमध्येही बेस्ट कॅप्टन का ठरेल? (Why Rohit Sharma Best Test Captain) याची 5 प्रमुख कारणं पाहूया

भक्कम रेकॉर्ड

रोहित शर्माचा कॅप्टन म्हणून भक्कम यशस्वी रेकॉर्ड आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद जिंकले आहे. फक्त आयपीएल नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचा कॅप्टन म्हणून भक्कम रेकॉर्ड आहे.

रोहितच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने आजवर 13 वन-डे खेळल्या असून त्यामध्ये 11 जिंकल्या आहेत. तर 2 मध्ये पराभव झालाय. तर 24 T20 इंटरनॅशनल खेळल्या असून यामध्ये 20 जिंकल्या असून 4 गमावल्या आहेत. रोहितचा वन-डे क्रिकेटमध्ये 84.61 टक्के तर T20 इंटरनॅशनलमध्ये 83.33 टक्के यशस्वी रेकॉर्ड* आहे. 2018 साली झालेल्या निदहास ट्रॉफी, आशिया कप स्पर्धेचं विजेतेपद रोहितच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं जिंकले होते. आता लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटचा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यापासूनही त्यानं 3 सलग सीरिज जिंकल्या (Why Rohit Sharma Best Test Captain) आहेत.

ICC स्पर्धेतील पराभवाचं रोहितनं सांगितलं कारण, कॅप्टन होताच मांडला वर्ल्ड कप जिंकण्याचा प्लॅन, VIDEO

संकटकाळी परतण्याची किल्ली

रोहित शर्मा हा शांत आणि खंबीरपणे शेवटपर्यंत लढणारा कॅप्टन म्हणून प्रसिद्ध आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) त्याची कॅप्टनसी ही त्याचं उदाहरण आहे. मुंबई इंडियन्सनं अनेक मॅच रोहितच्या कॅप्टनसीच्या जोरावर जिंकल्या आहेत. अगदी आयपीएल स्पर्धेत बाद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुंबई इंडियन्सला रोहितनं ‘प्ले ऑफ’ मध्ये नेलं आणि पुढं विजेतेपद पटकावलं हा इतिहास आहे.

आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही रोहितची संकटकाळी टीमला हातळण्याचे कौशल्य आणि मॅचच्या परिस्थितीची समज अनेकदा दिसली आहे. 2018 साली झालेल्या मेलबर्न टेस्टमध्ये बुमराहाल स्लो यॉर्कर टाकण्याचा सल्ला रोहितनं दिला होता. त्या बॉलवर बुमराहला शॉम मार्शची विकेट मिळाली. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship) फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. त्यावेळी रोहितचा संकटातून परतण्याचा अनुभव टीम इंडियाला उपयोगी ठरणार आहे.

सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये

रोहित शर्मानं लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करुन बराच कालाधी उलटला आहे. या प्रकारात ओपनिंग बॅट्समन म्हणून त्याचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याचबरोबर तो आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील स्थिरावला आहे.

रोहित शर्मा इंग्लंडच्या स्वींग खेळपट्ट्यांवर चालणार नाही, असा अनेकांचा अंदाज होता. रोहितनं या सर्वांना खोटं ठरवत इंग्लड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England Test Series 2021) भारताकडून सर्वाधिक रन केले. त्यानं विदेशातील पहिली टेस्ट सेंच्युरी देखील ओव्हलमध्ये अगदी निर्णायक क्षणी झळकावली. रोहितचा हा फॉर्म त्याला कॅप्टन म्हणून काम करण्यासाठी उपयुक्त ठरणार (Why Rohit Sharma Best Test Captain) आहे.

एकमेव योग्य पर्याय

रोहित शर्माच्या ऐवजी टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishbah Pant), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांची चर्चा होती. यापैकी राहुलनं कॅप्टन म्हणून दक्षिण आफ्रिकेत निराशा केली. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं सर्व मॅच गमावल्या. तर ऋषभ पंतला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तितका अनुभव नाही. तसंच तो बॅटर म्हणूनही अनेकदा उतावीळपणे विकेट फेकतो.

जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात महत्त्वाचा फास्ट बॉलर आहे. त्याला मोठ्या सीरिजमध्ये फ्रेश राहण्यासाठी ठराविक अंतराने विश्रांती देणे आवश्यक आहे. त्यामुळे तो पूर्णवेळ खेळू शकणार नाही. रोहित शिवाय अन्य सर्व पर्याय हे अपुरे आहेत. हेच नेमक्या शब्दात सांगायचं तर रोहित शर्मा हाच टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून एकमेव योग्य पर्याय आहे.

टीम निवडीचं पंचवार्षिक दुखणं, द्रविड कधी देणार कडू गोळी?

सर्वच फॉर्मेटमध्ये एकच कॅप्टन

भारतीय क्रिकेटमध्ये आजवर कधीही दोन्ही प्रकारासाठी वेगळे कॅप्टन हा पर्याय झालेला नाही. महेंद्रसिंह धोनी लिमिटेड ओव्हरचा कॅप्टन झाला त्यावेळी अनिल कुंबळे त्या प्रकारातून रिटायर झाला होता. तसंच धोनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर विराट टेस्ट टीमचा कॅप्टन झाला. दोन वेगळ्या फॉर्मेटमधील कॅप्टन एकमेकांच्या नेतृत्त्वात खेळल्याचा प्रकार भारतीय क्रिकेटमध्ये फारसा झालेला नाही.

त्याचबरोबर काही ठराविक काळाचा अपवाद वगळता भारतामध्ये नेहमीच सर्व प्रकारासाठी एकच कॅप्टन राहिला आहे. या सर्व कारणामुळे रोहितला टेस्ट टीमचा कॅप्टन करण्याचा निर्णय योग्य असून तो आगामी काळात बेस्ट कॅप्टन ठरणार (Why Rohit Sharma Best Test Captain) आहे.

श्रीलंका विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (व्हाईस कॅप्टन) मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाल विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएस भरत, आर. अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार

* लेखातील आकडेवारी ही दिनांक 19/2/2022 पर्यंतची आहे

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: