
‘रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेट खेळू शकत नाही,’ अशी ओरड करणाऱ्या मंडळींना रोहितनं खणखणीत उत्तर दिलं आहे. या आठवड्यात जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) रोहितनं 5 व्या क्रमांकावर उडी मारलीय. ही रोहितच्या टेस्ट करिअरमधील सर्वोच्च रँकिंग आहे. तो आता विराट कोहलीला मागं टाकत (Rohit Sharma overtakes Virat Kohli) टीम इंडियाचा नंबर 1 बॅट्समन बनला आहे.
चार वर्षांनी विराट पिछाडीवर
आयसीसीनं 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या रँकिंग नुसार रोहित शर्माचे 773 पॉईंट्स असून तो विराट कोहलीपेक्षा 7 पॉईंट्सनं पुढे आहे. ताज्या रँकिंगमध्ये रोहित पाचव्या तर विराट सहाव्या क्रमांकावर आहे.
विराटला नोव्हेंबर 2019 नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. याचा फटका त्याला बसलाय. तो आता टॉप 5 च्या बाहेर पडलाय. तसंच टीम इंडियाचा नंबर 1 बॅट्समन असल्याचा मानही त्यानं चार वर्षांनंतर गमावला आहे. यापूर्वी 2017 साली चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्याच्या पुढं होता. तेव्हा पुजारा दुसऱ्या तर विराट पाचव्या नंबरवर (Rohit Sharma overtakes Virat Kohli) होता.
3 वर्षांमध्ये पलटली बाजी
रोहित शर्मानं 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिली टेस्ट खेळण्यासाठी त्याला 6 वर्ष म्हणजेच 2013 पर्यंत वाट पाहवी लागले. तो पर्यंत तो लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये स्थिरावला होता. वन-डे क्रिकेटमध्ये एक नाही दोन नाही तर तीन डबल सेंच्युरी रोहितच्या नावावर आहेत. पण त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होती येत नव्हतं. त्यामुळे त्याचे टेस्टमध्ये आत-बाहेर सुरू होते. हा टेस्ट क्रिकेटसाठी योग्य नाही, असाही अनेकांचा आक्षेप होता.
रोहित 2018 साली टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ओपनिंगला आला. त्यावेळी तो 54 व्या क्रमांकावर होता. रोहितनं 2017 पर्यंत 23 टेस्ट खेळल्या होत्या. यामध्ये त्यानं 42 च्या सरासरीनं 1401 रन काढले. यामध्ये 3 सेंच्युरी आणि 9 हाफ सेंच्युरींचा समावेश होता. आता 2018 साली ओपनर झाल्यापासून रोहितनं 19 टेस्टमध्ये 50.26 च्या सरासरीनं 1508 रन काढले आहेत. यामध्ये 4 सेंच्युरी आणि 5 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.
आता एकाच गोष्टीची प्रतीक्षा
रोहित शर्मानं इंग्लंड विरुद्ध सध्या सुरू असलेल्या टेस्ट सीरिजमध्येही चांगला खेळ केलाय. त्यानं आत्तापर्यंत 3 टेस्टमध्ये 46 च्या सरासरीनं 230 रन बनवले आहेत. यामध्ये 2 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. या सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत तो जो रूट (507) आणि केएल राहुल (252) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
‘हे’ 3 जण ठरु शकतात अजिंक्य रहाणेचा ओव्हल टेस्टमध्ये पर्याय!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही रोहितनं चांगली बॅटींग केलीय. इंग्लंडमधील स्विंग पिचवर तो यशस्वी होणार नाही, हा अंदाज व्यक्त करणाऱ्या मंडळींचे दातही त्यानं घशात घातले आहेत. आता विदेशात टेस्ट सेंच्युरी झळकावण्याची त्याला आजवर न जमलेली गोष्ट पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता (Rohit Sharma overtakes Virat Kohli) तो ही प्रतीक्षा इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 2 टेस्टमध्येच पूर्ण करू शकतो.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.