
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या इतिहासातील आजवरची सर्वात यशस्वी टीम आहे. आयपीएल स्पर्धेची 13 पैकी पाच विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावली आहेत. त्यामध्ये मागील चार वर्षातील तीन विजेतेपदांचा समावेश आहे. त्यांनी 2020 चे आयपीएल अगदी थाटात जिंकले. त्यामुळे ‘मुंबई इंडियन्स’ जगातील सर्वात बेस्ट आयपीएल टीम आहे का? अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झालीय. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने यापूर्वी एकदा PTI ला दिलेलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या टीमच्या यशाचे गुपीत सांगितले आहे. यावर्षीच्या आयपीएल ऑक्शनच्या (IPL Auction) निमत्तानं मुंबई इंडियन्सच्या यशाचे गुपित (MI Secret) सर्वांनी समजून घेतलं पाहिजे.
आमची टीम का यशस्वी आहे?
“ होय, आमच्याकडे (कायरन) पोलार्ड, हार्दिक (पंड्या), (जसप्रीत) बुमराह हे खेळाडू आहेत. पण आमची टीम यशस्वी का आहे याचा कुणी विचार केला आहे का? असा प्रश्न रोहितने विचारला.
( वाचा : IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )
“तो (रोहित) अन्य टीमकडून अशा प्रकारची कामगिरी करु शकतो का? असा प्रश्न अनेक जण विचारतात हे मला माहिती आहे. मी अन्य टीमकडून अशा प्रकारची कामगिरी का करावी हा प्रश्न मला पहिल्यांदा त्यांना विचारावा वाटतो. एका विशिष्ट दिशेने वाटचाल करण्याची फ्रँचायझीची इच्छा आहे. मला देखील एक खेळाडू आणि कॅप्टन म्हणून त्याच मार्गाने जायला आवडतं,” असं रोहित शर्माने सांगितलं.
एका रात्रीतलं यश नाही!
“मुंबई इंडियन्स ही एका रात्रीत चांगली टीम बनली आहे का? नाही. या फ्रँचायझीचा सतत बदल करण्यावर विश्वास नाही. 2011 साली सर्व खेळाडू (रोहित शर्मासह) लिलावामध्ये उपलब्ध होते. मुंबई इंडियन्सने त्यांची निवड केली. त्यांच्यावर विश्वास दाखवला (MI Secret) आणि टीम बांधली,” असे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
रोहित शर्माने 2013 ची आयपीएल सुरु असताना रिकी पॉन्टिंगकडून कॅप्टनसी स्विकारली होती. त्याच वर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले होते. रोहितच्या कॅप्टनसीखालीच मुंबई इंडियन्सने आतापर्यंतची सर्व पाच विजेतेपदं जिंकली आहेत.
( वाचा : IPL 2021 Auction: कोणत्या खेळाडूंवर असेल केकेआरची नजर? )
आयपीएल 2020 मध्ये रोहित शर्मा दुखापतीमुळे काही मॅच खेळू शकला नाही, पण त्याच्या अनुपस्थितीचा टीमच्या वाटचालीवर कोणताही परिणाम झाला नाही. मुंबई इंडियन्सने मोठ्या दिमाखात आधी बाद फेरी, नंतर फायनल आणि शेवटी विजेतेपद पटकावले. रोहितने आयपीएल 2020 मध्ये 12 मॅचमध्ये 27.66 च्या सरासरीने 366 रन्स केले. यामध्ये तीन हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.