फोटो – आयसीसी

रशिया आणि युक्रेन युद्धाचे (Russia – Ukraine War) पडसाद क्रीडा जगतामध्येही उमटले आहेत. फिफा (Federation Internationale de Football Association, FIFA) आणि त्याची संलग्न संस्था असलेल्या युरोपीन फुटबॉल असोसिएशन ( Union of European Football Associations, UEFA) या संस्थेनं रशियावर बंदी घातली आहे. रशियाची राष्ट्रीय टीम आणि क्लब यांना पुढील सूचना मिळेपर्यंत फुटबॉल खेळण्यापासून निलंबित केले आहे, अशी घोषणा या दोन्ही संघटनांनी केली आहे. फिफानं केलेल्या या घोषणेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं (ICC) बोध घ्यावा. आयसीसीनं पाकिस्तानवर बंदी घालावी (ICC Ban Pakistan) अशी मागणी काँग्रेस नेते अभिषेक संघवी (Abhishek Singhvi) यांनी केली आहे.

रशियावर बंदी का?

रशियानं युक्रेनवर हल्ला केला म्हणून त्यांच्या फुटबॉल टीमवर बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (IOC) रशियन खेळाडू आणि अधिकाऱ्यांना कोणत्याही खेळामध्ये सहभागी करू नये, असं आवाहन केलं होतं, त्याला प्रतिसाद देत फुटबॉलमधील या दोन बड्या संस्थांनी रशियावर ही कारवाई केली आहे.

फिफाच्या या निर्णयामुळे रशियामध्ये आता कोणतीही आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅच होणार नाही. तसंच रशियन टीमलाही त्यांच्या नावासह आणि राष्ट्रध्वजासह दुसऱ्या देशांमध्ये फुटबॉल मॅच खेळता येणार नाही. फुटबॉल युनियन ऑफ रशिया (RFU) या नावावे त्यांना खेळावे लागेल. फिफाच्या या निर्णयाने यावर्षी कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये रशियाचा सहभाग अनिश्चित बनला आहे.

पाकिस्तानवर बंदी हवी

फिफाच्या या निर्णयाचे पडसाद भारतामध्येही उमटले आहेत. आयसीसीनं पाकिस्तानवर बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस नेते अभिषेक संघवी यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.

‘जर फिफा 2022 मधील फुटबॉल वर्ल्ड कपमधून रशियाला निलंबित करतं तर कारगिल, 26/11 आणि अशा अलिकडच्या काळातील अनेक घटनांच्या आधारावर पाकिस्तानवर बंदी घालण्यास आयसीसीला कुणी अडवलं आहे?’ असं ट्विट अभिषेक संघवी यांनी केलं (ICC Ban Pakistan) आहे.

पाकिस्तानचा इतिहास काय सांगतो?

पाकिस्तान देशाचा स्थापनेपासून भारत विरोध हा अजेंडा आहे. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनीच पाकिस्तान लष्करानं टोळीवाल्यांच्या नावाखाली काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. 1948 मध्ये झालेल्या त्या युद्धासह 1965 आणि 1971 च्या युद्धात पाकिस्ताननं सपाटून मार खाल्ला. 1971 मध्ये पाकिस्तानची फाळणी झाली. त्यानंतर भारतविरोधी लढण्याची पाकिस्तानची खुमखूमी गेलेली नाही.

कारगिल युद्ध, संसदेवरील हल्ला, मुंबईत 26 नोव्हेंबरला झालेला दहशतवादी हल्ला ही पाकिस्तानच्या दहशतवादी चेहऱ्याची प्रमुख उदाहरणं आहेत. भारतामधील अनेक शहरांमध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि गेल्या 75 वर्षातील बहुतेक भारतविरोधी गोष्टींचे पाकिस्तान कनेक्शन आहे. जावेद मियाँदाद ते शाहिद आफ्रिदीपर्यंत वेगवेगळे पाकिस्तानी क्रिकेटपटूही संधी मिळाली की भारतविरोधी गरळ ओकत (ICC Ban Pakistan) असतात.

भारतविरोधी विखार भरलेला क्रिकेटपटू कमी, गुंड जास्त

क्रिकेट टीमवर हल्ला

पाकिस्तानमध्ये क्रिकेटही सुरक्षित नाही. लाहोरमध्ये 2009 साली श्रीलंकन टीमच्या बसवर हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात श्रीलंकन टीमचे खेळाडू जखमी झाले. त्यानंतर 10 वर्षांहून अधिक काळ पाकिस्तानात क्रिकेट झाले नाही. अगदी गेल्यावर्षी न्यूझीलंडनं सुरक्षेच्या कारणामुळेच पाकिस्तानमधून ऐनवेळेस निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ऑस्ट्रेलियन टीम तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानात दाखल झाली आहे.

भारत आणि पाकिस्तान हे देश देखील 2013 नंतर एकमेकांच्या विरूद्ध द्विपक्षीय सीरिज खेळलेले नाहीत. दोन्ही देशांच्या टीम आता फक्त आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांच्या विरूद्ध क्रिकेट खेळतात. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना परवानगी नाही. बीसीसीआयच्या पैशांवरच पाकिस्तान क्रिकेटचे अस्तित्व टिकून आहे, अशी कबुली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमिझ रझा यांनी यापूर्वी (ICC Ban Pakistan) दिली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: