
क्रिकेट वर्ल्ड 20219 मधील (Cricket World Cup 2019) सेमी फायनलमध्ये टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाली. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्या मॅचमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात रन आऊट झाला. ‘त्या’ पराभवानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळला नाही. धोनी रिटायर होण्याची चर्चा काही दिवसानंतर अचानक वेग घेत असे. पण, धोनीच्या मनात काय आहे? याचा थांग कुणालाही नव्हता. आणि अचानक 15 ऑगस्ट 2020 या दिवशी संध्याकाळी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होत असल्याचं जाहीर केलं. धोनीनं त्याच्या स्वभवानुसार त्या रिटायरमेंटबद्दल आजवर कुठेही जाहीर काही सांगितलेलं नाही. मात्र त्या दिवशी धोनी सोबत असलेल्या त्याच्या सहकाऱ्यानं 10 महिन्यानंतर तो अनुभव (Dhoni’s Retirement Day) शेअर केला आहे.
‘आम्हाला काहीही कल्पना नव्हती’
महेंद्रसिंह धोनीनं रिटायरमेंट जाहीर केली त्या दिवशी तो चेन्नईमध्ये होता. चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) काही खेळाडू दुबईला जाण्यापूर्वी एकत्र प्रॅक्टीस करत होते. त्या खेळाडूंपैकी एक असलेल्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) धोनीच्या रिटायरमेंटचा अनुभव सांगितला आहे.
“आम्ही 10-12 जण दुबईला जाण्यापूर्वी चेन्नईत एकत्र प्रॅक्टीस करत होतो. आम्ही संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एकत्र सराव केला. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मला कुणीतरी सांगितलं की माही भाईंनी इन्स्टाग्रामवरुन त्यांच्या रिटायरमेंटची घोषणा केली आहे. त्या दिवशी (Dhoni’s Retirement Day) काहीही वेगळं घडलं नव्हतं. कसलीही चर्चा झाली नव्हती. असं काही घडेल याचे कोणतेही संकेत नव्हते. पण तुम्ही त्यांच्याबाबतीमध्ये कोणताही अंदाज करु शकत नाही.” असं ऋतुराजनं ‘इंडिया टीव्ही’ शी बोलताना सांगितले.
ON THIS DAY: महेंद्रसिंह धोनीने दिला होता क्रिकेट विश्वाला धक्का!
‘विचारण्याची हिंमत झाली नाही’
ऋतुराजनं पुढे सांगितले की, “मला या विषयावर धोनीला काही विचारण्याची हिंमत झाली नाही. आमच्या सर्वांसाठीच तो धक्का होता. आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहणार नाहीत. त्याच्यासारख्या उंचीचा माणूस अशा पद्धतीनं रिटायर (Dhoni’s Retirement Day) होऊ शकतो, हे पचण्यासाठी आम्हाला 2-3 दिवस लागले.’’
धोनी एकमेव कॅप्टन
क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक म्हणून धोनी ओळखला जातो. व्हाईट बॉल क्रिकेटमधील आयसीसीच्या सर्व जागतिक स्पर्धांचं (क्रिकेट वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) विजेतेपद पटकावणारा तो एकमेव कॅप्टन आहे. धोनीनं 350 वन-डे मध्ये 50.57 च्या सरासरीने 10773 रन केले आहेत. यामध्ये 73 हाफ सेंच्युरी आणि 10 सेंच्युरींचा समावेश आहे. धोनी टीम इंडियाचा आजवरचा सर्वोत्तम विकेट किपर असून त्याने वन-डे क्रिकेटमध्ये 321 कॅच आणि 123 स्टंपिंग केले आहेत. तर, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये धोनीनं 98 मॅचमध्ये 126.13 च्या स्ट्राईक रेटनं 1617 रन काढले. तसंच 57 कॅच आणि 34 स्टंपिंग करत टीमच्या कामगिरीमध्ये योगदान दिले आहे.
Dhoni finishes off in style! आणि भारत पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.