अनिश्चिततेचा खेळ समजल्या जाणाऱ्या क्रिकेटला निश्चित म्हणजे फिक्स करण्याच्या प्रकरणात जेलमध्ये जाऊन आलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट आता अंपायर होण्याच्या (Salman Butt Umpire) तयारीत आहे. इंग्लंड विरुद्ध 2010 साली झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) प्रकरणात सलमान दोषी आढळला होता. या प्रकरणात ब्रिटनच्या कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर त्या काही दिवस त्याच्या फिक्सिंग प्रकरणातील सहकाऱ्यांसोबत जेलमध्ये शिक्षा भोगली आहे.

कसा होणार अंपायर?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) अंपायर आणि मॅच रेफ्रीसीठी कोर्स सुरु केला आहे. हा कोर्स तीन लेव्हलमध्ये पूर्ण होणार आहे. यापैकी पहिली लेव्हल ऑन लाईन शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. यात अंपायरिंग तसेच क्रिकेटच्या वेगवेगळे नियम शिकवण्यात आले आहेत. यामध्ये 49 क्रिकेटपटूंसह 346 जण सहभागी झाले होते. त्यात सलमानचा समावेश (Salman Butt Umpire) होता.  

हा कोर्स पूर्ण केलेल्या सर्व उमेदवारांना पाकिस्तानमधील शाळा, महाविद्यालय तसंच स्थानिक शहरातील क्रिकेट मॅचमध्ये अंपायर तसेच मॅच रेफ्री म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंपायरिंगचा अनुभव पुरेसा झाल्यानंतर त्यांचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अंपायर आणि मॅच रेफ्रीच्या मुख्य यादीत (Elite List)  समावेश होईल.

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना रोजगार देण्याच्या उद्देशाने हा कोर्स सुरु करण्यात आलेला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियमित कारभाराचा भाग असलेला हा कोर्स सलमान बटच्या सहभागामुळे चर्चेत आलाय.

6 महिन्यांमध्ये रिटायरमेंट संपले, मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानकडून खेळण्यास तयार

सलमानचा फिक्सिंगचा इतिहास

पाकिस्तानची टीम 2010 साली इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी लॉर्ड्स टेस्टमध्ये नॉ बॉल टाकण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी पैसे घेतल्याचं स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं. या प्रकरणात मोहम्मद आमिर (Mohammad Amir), मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) आणि तेव्हाच्या पाकिस्तानच्या टीमचा कॅप्टन सलमान बट सहभागी होते. त्यामुळे क्रिकेट विश्वातील कीड असलेल्या फिक्सिंग प्रकरणात आमिरवर 5 वर्ष, आसिफवर 7 वर्ष तर सलमानवर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली.

या तीन फिक्सर्सपैकी मोहम्मद आमिर 2016 साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीममध्ये परतला. त्यानंतर टीम मॅनेजमेंटवर नाराज होत आमिरनं मागच्या वर्षी रिटायर होण्याची घोषणा केली. आता सहा महिन्यांमध्येच रिटायरमेंट मागे घेत परत येण्याची तयारी करत आहे. आसिफ आणि सलमानला परत टीममध्ये संधी मिळाली नाही. त्यांचे क्रिकेट करियर समाप्त झाले.

सलमान बट या ऑक्टोबर महिन्यात 37 वर्षांचा होईल. त्याचे वय लक्षात घेता त्याला या नव्या इनिंगमध्ये बरंच काम करण्याची संधी मिळू शकते. पण एक फिक्सर अंपायर होणार (Salman Butt Umpire) या बातमीने क्रिकेट विश्वात नाराजी पसरली आहे. हा जोक आहे का? अशी प्रतिक्रिया नेटीझन्सनी दिली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: