पाकिस्तान क्रिकेटमधील वादग्रस्त प्रकरणात आणखी एक पान जोडलं गेलं आहे. पाकिस्तानचा माजी टेस्ट क्रिकेटर समी अस्लम (Sami Aslam) यानं यापूर्वीच देश सोडला आहे . तो आता अमेरिकेकडून (USA) क्रिकेट खेळणार आहे. पाकिस्तानच्या निवड समितीनं त्यांचे आवडीचे खेळाडू 20  मॅचमध्ये अपयशी ठरले तरी त्यांना वारांवार संधी दिली. तर, न आवडत्या क्रिकेटपटूंना एक मॅचमध्ये अपयश आल्यावर कायमचं टीममधून काढलं असा आरोप त्यानं (Sami Aslam on Pakistan) केला आहे.

कोण आहे समी इस्लाम?

सध्या 25 वर्षांचा असलेला समी अस्लम हा पाकिस्तान क्रिकेटचं मुख्य केंद्र असलेल्या लाहोरचा क्रिकेटपटू आहे. डाव्या हाताचा ओपनिंग बॅट्समन असलेला समी हा पाकिस्तानकडून 2 अंडर 19 वर्ल्ड कप खेळला आहे. 2014 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये तो पाकिस्तानचा कॅप्टन होता. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं फायनलपर्यंत धडक मारली होती.

समीनं 2015 साली बांगलादेश विरुद्ध झालेल्या टेस्ट मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं 13 टेस्टमध्ये 31.58 च्या सरासरीनं 758 रन काढले आहेत. यामध्ये 6 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. 91 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. समीला फक्त 4  आंतरराष्ट्रीय वन-डे खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्यानं 19.50 च्या सरासरीनं 78 रन केले आहेत. 45 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. तो 2017 साली श्रीलंकेविरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळला आहे. पाकिस्तानमधील फर्स्ट क्लास आणि A श्रेणीच्या क्रिकेटमध्ये मिळून त्याच्या नावावर 25 सेंच्युरी आणि 40 हाफ सेंच्युरी आहेत.

Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे! तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही?

पाकिस्तान क्रिकेटवर आरोप

समी गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय टीममध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये तो अपयशी ठरला. त्यामुळे त्यानं अखेर कंटाळून अमेरिकेत स्थायिक होण्याचा आणि अमेरिकेच्या टीमकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.

टेस्ट टीममधून वगळल्यानंतर समीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय टीममध्ये निवड होण्याची अपेक्षा होती. पण त्याची स्थानिक टीममधूनही हकालपट्टी झाली. निवड समितीच्या सदस्यांशी देखील या विषयावर चर्चा केली, पण काही उत्तर मिळालं नाही (Sami Islam On Pakistan)  असा त्याचा दावा आहे.

“मी अनेकांशी चर्चा केली. मला अशी वागणूक का मिळत आहे? माझी निवड का होत नाही?  हे प्रश्न त्यांना विचारले, पण कोणतंही उत्तर मिळालं नाही. एकानंही याची जबाबदारी स्विकारली नाही. प्रत्येक जण दुसऱ्याला दोष देत होता. काही जण एका मॅचच्या जोरावर नियमित खेळत होते. तर, सतत चांगली कामगिरी करुनही माझी पुन्हा निवड झाली नाही, असा आरोप समीनं केला (Sami Aslam On Pakistan)  आहे.

एका पराभवानंतर लाथाळ्या उघड, पाकिस्तानच्या माजी कॅप्टननं केली आंतरराष्ट्रीय कोचची मागणी

1 टक्के देखील पश्चाताप नाही!

अमेरिकेतील नियमानुसार समी नोव्हेंबर 2023 साली अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमकडून खेळण्यास पात्र होईल. या निर्णयाचा मला एक टक्का देखील पश्चाताप नाही. मी दोन वर्ष खूप डिप्रेशनमध्ये होतो. आता आनंदी आहे. कारण, येत्या दोन वर्षात मी अमेरिकेकडून खेळणार असल्याचं या पाकिस्तानच्या माजी टेस्ट प्लेयरनं सांगितलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: