
ज्याचं क्रिकेटमधलं वय खोटं होतं. ज्यानं क्रिकेट खेळण्यासाठी खोटेपणाचा (Ball Tempering) आधार घेतला होता. जो क्रिकेट खेळताना खोटं बोलत होता (आठवा, शोएबला खेळताना पाहून सचिन तेंडुलकरचे पाय कापत होते. हे मी पाहिलंय,’ ) त्या खेळाडूचं मन स्वच्छ असेल अशी अपेक्षा ठेवण्यासाठी खूपच भाबडं असायला हवं. गलिच्छ मनाचा हा खेळाडू पाकिस्तानचा असेल तर त्यानं भारताबद्दल बोलण्यासाठी तोंड उघडल्यावर तो गरळ ओकणार हे ओघानं आलंच. होय, आम्ही हे सर्व शाहिद आफ्रिदीबद्दल (Shahid Afridi) बोलतोय. नेहमीच समांतर विश्वात राहणाऱ्या आफ्रिदीनं काश्मीरला (Kashmir) स्वतंत्र करण्याची भाषा केली आहे.
( वाचा : अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची ‘आमिर’ कथा! )
काय म्हणाला आफ्रिदी?
शाहिद आफ्रिदी कायम भारताविरुद्ध बडबड करण्यासाठी प्रसिद्ध आहे. “भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील लोकांवर खूप अत्याचार होत आहे. भारतानं अन्याय करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता आपण त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला हवा. ती वेळ नक्की येईल, जेंव्हा काश्मीर स्वतंत्र होईल. काश्मिरी लोकांसाठी सतत आवाज उठवणे ही सरकारची जवाबदारी आहे,’’ अशी आफ्रिदीची भाषा आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये काश्मीर प्रीमियर लीग (KPL ) या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्या भागातील लोकांवर पाकिस्ताननं आजवर सतत दुर्लक्ष केलं त्यांचं लक्ष क्रिकेटमध्ये गुंतवण्याचा पाकिस्तानचा यामधून प्रयत्न आहे. या स्पर्धेचा आफ्रिदीला ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) करण्यात आलं आहे. क्रिकेटमध्ये ज्यानं कधीही जबाबदारीनं खेळ केला नाही, असा आफ्रिदी आता पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणांसाठी क्रिकेट अकादमी उघडण्याची भाषा करतोय. तर केपीलमधून तयार झालेल्या तरुणांची टीम पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळेल असा विश्वास या लीगचे अध्यक्ष आरिफ मलिक यांना आहे. त्यांनी या लीगसाठी लोकांकडून पैसे गोळा करण्याची घोषणा देखील केली आहे.
( वाचा : शोएब अख्तरचे ‘गझवा-ए-हिंद’ के जहरीले सपने, ‘काश्मीर ताब्यात घेऊ, भारतावर हल्ला करु’ – पाहा VIDEO )
अख्तरलाही पडलं होतं स्वप्न!
पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) ‘गझवा ए हिंद’ (Ghazwa-e-Hind) ची भाषा करणारा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता त्यानंतर शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी काड्या केल्या आहेत. अख्तर, आफ्रिदी किंवा अन्य पाकिस्तानी मंडळींना अपेक्षित असलेल्या युद्धाला भविष्यात तोंड फुटलंच तर त्यामध्ये पाकिस्तानचा किती मोठा पराभव होईल, यावरच फक्त पैजा लागू शकतात.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.