फोटो सौजन्य – ट्विटर

पाकिस्तानचा (Pakistan) माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) वादग्रस्त आणि आचरट वर्तनासाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याची ही सवय क्रिकेट विश्वाने पाहिली आहे. आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झालाय, पण अजूनही त्याची सवय गेलेली नाही.

श्रीलंकेत सुरु असलेल्या लंका प्रीमियम लीगमध्ये (एलपीएल) आफ्रिदी पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आफ्रिदी या लीगमधील गॉल ग्लॅडीएटर्स या टीमचा कॅप्टन आहे. या स्पर्धेला जाण्यासाठी आफ्रिदीचे पहिले विमान चुकले आणि तो नंतर काही दिवसांनी श्रीलंकेत दाखल झाला.

आफ्रिदी नियोजीत वेळेत आला नसल्याने श्रीलंकेतील क्वारंटाईन नियमानुसार त्याला किमान पहिल्या दोन मॅच खेळता येणार नाहीत, असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र, आफ्रिदी क्वारंटाईन झालाच नाही!  आफ्रिदीला जून महिन्यात चायनीज व्हायरस या विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे श्रीलंकेत आल्यावर त्याची फक्त प्रतीजैविक चाचणी घेण्यात आली, या चाचणीनंतर आफ्रिदी फिट असल्याचं एलपीएल प्रशासनाने जाहीर केले आणि आफ्रिदी श्रीलंकेत आल्यानंतर दोन दिवसांतच जाफना स्टॅलिअन्स विरुद्ध पहिली मॅच खेळला.

जाफनाविरुद्ध आफ्रिदीने 23 बॉल्समध्ये 58 रन्सची आक्रमक खेळी केली. एकाच ओव्हरमध्ये चार सिक्सर्सही खेचले. आफ्रिदीने क्वारंटाईन न होता क्रिकेट मॅच खेळून हाफ सेंच्युरी करण्याचा विक्रम केला आहे.

गॉल ग्लॅडीएटर्सचे पाकिस्तान कनेक्शन

शाहिद आफ्रिदी कॅप्टन असलेल्या गॉल ग्लॅडीएटर्स टीमचे पाकिस्तानशी घट्ट कनेक्शन आहे.  त्या टीमचा मालक नदीम ओमर, संचालक झहीर अब्बास, मुख्य कोच मोईन खान हे सर्व पाकिस्तानी आहेत. त्याचबरोबर त्या टीमचा मेंटॉर हा पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वासिम अक्रम असून मॅनेजर आझम खानही पाकिस्तानी आहे.

गॉलच्या टीमचे पाकिस्तानी कनेक्शन इथेच संपत नाही, त्यांच्या टीमचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीसह, मोहम्मद आमिर, सर्फराज अहमद, आझम खान आणि अहसान अली हे पाच परदेशी खेळाडू पाकिस्तानचे आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: