फोटो – व्हायरल

तालिबान ही जगातील प्रमुख दहशतवादी संघटना आहे. अफगाणिस्तानमध्ये 1990 च्या दशकात त्यांनी केलेलं फतव्यांचं राज्य जग अजूनही विसरलेलं नाही. आता 20 वर्षांनी तालिबानी पुन्हा अफगाणिस्तानचे सत्ताधीश बनले आहेत. त्यांची सत्ता येताच संपूर्ण देशात सुरू झालेली पळापळ ही तर अगदी ताजी आहे. ती पळापळ करणारे, भेदरलेले अफगाणी नागरिक हे सर्व जगानं पाहिले आहे. अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडण्याचा धडपडा का करत आहेत? त्यांना भीती कशाची वाटतीय? हे तालिबानी रोज जगाला दाखवत आहेत. त्यांच्या क्रुरतेच्या नव्या बातम्या, व्हिडीओ रोज प्रसिद्ध होत आहेत. मानवतेचा, शांततेचा, समृद्धीचा गळा घोटणाऱ्या तालिबानची पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं (Shahid Talibani Afridi) जोरदार बाजू घेतली आहे.

आफ्रिदी आणि वाद याचं जुनं नातं आहे. त्याची खोटी जन्म तारीख, खेळाडूंशी मतभेद, मैदानात बॉल चावणे, वेगवेगळ्या काळात घेतलेल्या रिटायरमेंट हे क्रिकेटमधील वाद कधीही विसरता येणार नाहीत. त्याचबरोबर तो संधी मिळेल तेव्हा भारत विरोधी गरळ देखील ओकत असतो. आता आफ्रिदीनं सध्याच्या तालिबान संकटात अफगाणिस्तानच्या सामान्य नागरिकांना जखम देणारं वक्तव्य केलं आहे.

तालिबानबद्दल बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘ तालिबान यंदा सकारात्मक वृत्तीनं आले आहेत. त्यांनी महिलांना काम करण्यास आणि राजकारणात उतरण्यासाठी परवानगी दिली आहे. या गोष्टी यापूर्वी पाहयला मिळाल्या नव्हत्या.’ आफ्रिदी (Shahid Talibani Afridi) इतक्यावरच थांबला नाही तर त्यानं तालिबान क्रिकेटला पूर्ण पाठिंबा देत आहे, असा दावाही केला.

तालिबानमुळेच अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान ही श्रीलंकेत होणारी क्रिकेट सीरिज होऊ शकली नाही. अफगाणिस्तानच्या महिला टीमला खेळण्यास तालिबान परवानगी देणार का हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. महिला टीम बंद झाली तर आयसीसीच्या नियमानुसार अफगाणिस्तानचे पूर्णवेळ सदस्यत्वही रद्द होऊ शकते.

राशिद खान (Rashid Khan) या अफगाणिस्तानच्या प्रमुख क्रिकेटपटूनं तालिबानला विरोधच केला आहे. आम्हाला एकटं पाडू नका असं आवाहन राशिदनं काही दिवसांपूर्वी क्रिकेट विश्वाला केलं होतं. आफ्रिदीनं राशिदच्या या भावनेचा विचार न करत तालिबानबद्दलचं त्याचं प्रेम जाहीर केलं आहे.

शाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली, काश्मीरला स्वतंत्र करण्याची केली भाषा!

अर्थात तालिबानसाठी पाकिस्तान हे दुसरं घरच आहे. तालिबानला घरातील माणसांप्रमाणेच सर्व मदत पाकिस्ताननं नेहमी केली आहे. त्यामुळे शाहिद तालिबानी आफ्रिदीचं हे ताजं वक्तव्य (Shahid Talibani Afridi) त्याच्या पाकिस्तानी वृत्तीला साजेसं आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: