फोटो – ट्विटर, बीसीसीआय

तामिळनाडूनं सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेचं (Syed Mushtaq Ali T20 Trophy) स्पर्धेचं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये तामिळनाडूनं कर्नाटकचा (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेट्सनं पराभव केला. तामिळनाडूचा फिनिशर शाहरूख खान फायनलमधील विजयाचा हिरो नंबर 1 (Shahrukh Khan Show) ठरला. शेवटच्या बॉलवर मॅच जिंकण्यासाठी 5 रनची गरज होती तेव्हा त्यानं सिक्स लगावत तामिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Shahrukh Khan Show

शाहरूखनं अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवत तामिळनाडूला विजेतेपद मिळवून दिले. 152 रनचा पाठलाग करताना तामिळनाडूची अवस्था 16 व्या ओव्हरनंतर 4 आऊट 97 अशी झाली होती. दर्शनच्या ओव्हरमध्ये संजय यादवनं फोर लगावत सुरुवात केली. तर शाहरूख खाननं एक सिक्स आणि फोर लगावत विजयाचं समीकरण 24 बॉल 55 वरून 18 बॉल 36 वर आणले.

यादव (5) आणि मोहम्मद (5) रन काढून आऊट झाले. त्यामुळे तामिळनाडूवर प्रेशर वाढले होते. शाहरुखननं 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत जिंकण्याची आशा कायम ठेवली. या सिक्समुळे तामिळनाडूला विजेतेपदासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये 16 रनची गरज होती.

कर्नाटककडून प्रतीक जैननं 20 वी ओव्हर टाकली. त्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला आर. साई किशोरनं (R. Sai Kishore) फोर लगावला. त्या ओव्हरमध्ये प्रतीकनं दोन वाईड बॉल टाकले. त्यामुळे तामिळनाडूला मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलवर 5 रनची गरज होती. शाहरूख खाननं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत तामिळनाडूला सनसनाटी विजय (Shahrukh Khan Show) मिळवून दिला.

शाहरुख खानने 15 बॉलमध्ये नाबाद 33 रन काढले. या खेळीत त्यानं 3 सिक्स आणि 1 फोर लगावला. याचाच अर्थ त्यानं फक्त 4 बॉलमध्ये 22 रन काढले. कर्नाटकचा व्हाईट बॉल क्रिकेट फायनलमधील हा पहिलाच पराभव आहे. कर्नाटकनं दोन वर्षांपूर्वी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या फायनलमध्ये तामिळनाडूचा 1 रननं पराभव केला होता. तामिळनाडूनं या पराभवाचा यंदा वचपा काढला.

दिनेश कार्तिकला चॅम्पियन करणाऱ्या खेळाडूबद्दल कुंबळे म्हणतो, ‘हा तर आमचा पोलार्ड’

साई किशोरचे योगदान

तामिळनाडूच्या या विजयात त्यांचा स्पिनर साई किशोरचेही मोठे योगदान आहे. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 12 रन देत रोहन कदम, मनिष पांडे (Manish Pandey) आणि बीआर शरथ या कर्नाटकच्या टॉप 4 मधील 3 जणांना आऊट केले. साईनं सुरूवातीच्या ओव्हर्समध्ये कर्नाटकच्या इनिंगला ब्रेक लावत त्याची उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली.

राहुल-कुंबेळनं 3 वर्ष केलं दुर्लक्ष, त्यांच्याच टीमविरुद्ध घेतल्या 4 बॉलमध्ये 4 विकेट्स

कर्नाटककडून या सिझनमधील फाईंड ठरलेल्या अभिनव मनोहरनं सर्वात जास्त 46 रन काढले. प्रवीण दुबेनं 33 रन काढत त्याला चांगली साथ दिली. तर सुचितनं 7 बॉलमध्ये 18 रनची फटकेबाजी करत कर्नाटकला 150 चा टप्पा ओलांडून दिला. कर्नाटकनं 152 च्या टार्गेटचे 119 बॉल संरक्षण केले होते. पण, शाहरूख खाननं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत (Shahrukh Khan Show) त्यांच्या हातातून ट्रॉफी हिसकावून घेतली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: