
शुभमन गिल (Shubman Gill) हा येत्या काळातील टीम इंडियाचा प्रमुख चेहरा आहे. गिलनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India tour of Australia) टीम इंडियात पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाचा ‘अजिंक्यगड’ समजल्या जाणाऱ्या ब्रिस्बेनमध्ये टेस्ट मॅचच्या पाचव्या दिवशी 91 रनची खेळी करत विजयाचा पाया रचला होता. सध्या गिलचा फॉर्म घसरलाय. तरीही त्याला निवड समितीनं आणखी एक संधी दिलीय. तो पुढील महिन्यात टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीशी (Virat Kohli) तुलना करताना गिलनं एक सकारात्मक (Gill on Kohli) वक्तव्य केलं आहे.
‘मी विराटला शिकवेन’
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) गिल खेळतो. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आजवर त्याच्या खेळाची आणि दर्जाची प्रशंसा केली आहे. यामध्ये विराट कोहलीचा देखील समावेश आहे.
गिलनं ESPNCricinfo’ या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. यावेळी त्याला वैयक्तिक आयुष्यासंबंधी 25 प्रश्न विचारण्यात आले. त्यात एक प्रश्न होता, ‘विराट कोहलीला कोणती गोष्ट शिकवण्याची तुझी इच्छा आहे?’
शुभमन गिलनं त्यावर तात्काळ उत्तर दिलं की (Gill on Kohli), “मी विराट कोहलीला फिफा गेम खेळायचं शिकवेल, कारण या खेळात तो माझ्याकडून नेहमी हरतो.” त्याचबरोबर भूतकाळात खेळण्याची संधी मिळाली तर ‘2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप’ खेळायला आवडेल, असं गिलनं स्पष्ट केलं.
Brisbane Test: शुभमन गिलची सेंच्युरी हुकली पण गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला!
‘T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद वडिलांना समर्पित करायचं आहे’
गिलला या मुलाखतीमध्ये ‘वडिलांना भेट काय देणार?’ हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर त्यानं “वडिलांना T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद समर्पित करण्याची माझी इच्छा आहे.’’ असं उत्तर गिलनं दिलं.
भारतामध्ये यावर्षी होणारा T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी त्याला इंग्लंड दौऱ्यात चांगला खेळ खेळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि शिखर धवन सारखे ओपनर्स टीममध्ये असताना गिलची निवड होणं हे अवघड आहे.
गिलचा फॉर्म चिंताजनक
शुभमन गिल ऑस्ट्रेलियातून परतल्यापासून त्याचा फॉर्म घसरला आहे. इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. तर आयपीएल स्पर्धेतील 7 मॅचमध्ये त्यानं केवळ 132 रन केले आहेत.
IND vs AUS: होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो!
या खराब कामगिरीनंतरही निवड समितीनं गिलच्या दर्जावर विश्वास ठेवत त्याची निवड केली आहे. इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीला फिफा गेम शिकवण्यासोबतच (Gill On Kohli) त्याच्याकडून बॅटींगमधील काही बारकावे शिकला तर ते गिलसाठी आणि टीम इंडिया या दोघांसाठीही फायदेशीर असणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.