फोटो – ट्विटर/ICC

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) 38 वर्षांचा आहे. त्याच्या वयात  बहुतेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झालेले असतात. अँडरसन 2003 पासून खेळतो आहे. त्याला मर्यादीत ओव्हर्सच्या टीममध्ये जागा नाही, पण त्याचं टेस्ट टीममधील स्थान अबाधित आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्ये (Galle) सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (SL vs ENG) त्यानं 40 रन्स देऊन 6 विकेट्स घेतल्या.

अँडरसनचा नवा रेकॉर्ड

अँडरसनची एका इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची ही 30 वी वेळ आहे. त्यानं या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ग्लेन मॅकग्राला (Glenn McGrath) मागं टाकलं आहे. आता या यादीमध्ये अँडरसन सहाव्या क्रमांकावर आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 800 विकेट्स घेणारा मुरलीधरन या यादीमध्ये देखील पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं तब्बल 67 वेळा हा पराक्रम केला आहे. त्यानंतर शेन वॉर्न (37), रिचर्ड हॅडली (36),  अनिल कुंबळे (35) आणि रंगना हेराथ (34) अशी टॉप फाईव्हची क्रमवारी आहे.

( वाचा : SL vs ENG: इंग्लंडचा कॅप्टन जो रुटची डबल सेंच्युरी, नव्या रेकॉर्ड्सची नोंद! )

आशिया खंडात 5 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा अँडरसन हा सर्वात वयस्कर गैर आशियाई क्रिकेटपटू बनला आहे. त्यानं 38 वर्ष 177 दिवसांचा असताना ही कामगिरी केली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रिचर्ड हॅडली यांच्या नावावर होता. हेडली यांनी 37 वर्ष 145 दिवसांचा असताना आशिया खंडात पाच विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. आशिया खंडात पाच विकेट्स घेण्याची त्याची दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 26 मार्च 2012 या दिवशी श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्येच त्यानं पाच विकेट्स घेतल्या होत्या. अँडरसनच्या भेदक बॉलिंगनंतरही इंग्लंडनं ती टेस्ट 75 रननं गमावली होती.

2007 पासून सातत्य

अँडरसननं यावेळी एका अनोख्या रेकॉर्डची नोंद केली. 2007 ते 2021 या कालखंडात प्रत्येक वर्षी किमान एकदा तरी एका इनिंगमध्ये पाच किंवा जास्त विकेट्स घेणारा तो एकमेव बॉलर बनला आहे.

( वाचा : ‘घरी येताना चांगले कपडे घालून ये’, अजिंक्यला दिली होती बायकोनं सूचना! – VIDEO )

भारताला इशारा!

श्रीलंकेविरुद्ध एका इनिंगमध्ये सहा विकेट्स घेऊन अँडरसननं भारताला इशारा दिला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या सीरिजला 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. फॉर्मात असलेला अँडरसनपासून टीम इंडियाला विशेष सावध राहावं लागणार आहे.

कुंबळेचा रेकॉर्ड धोक्यात!

अँडरसन या भारत दौऱ्यात टीम इंडियाचा सर्वात यशस्वी टेस्ट बॉलर अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. कुंबळेनं टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 619 विकेट्स घेतल्या आहेत. आता अँडरसन या मॅचमध्ये तो रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: