फोटो – ट्विटर/ICC

श्रीलंका विरुद्ध इंग्लंड (SL vs ENG) यांच्या गॉलमध्ये (Galle) सुरु असलेल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Jo Root) डबल सेंच्युरी झळकावली. रुटनं जवळपास 8 तास (476 मिनिटं) किल्ला लढवला. त्यानं 321 बॉल्समध्ये 18 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 228 रन्स काढले. चौथ्या क्रमांकावर आलेला रुट सर्वात शेवटी आऊट झाला. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 286 रन्सची मोठी आघाडी घेतली. इंग्लंडच्या 421 रन्सपैकी 228 रन्स रुटनं काढले. त्याच्याशिवाय पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही टीमच्या मिळून फक्त दोन बॅट्समननं 30 पेक्षा जास्त रन्स केले. त्यावरुन रुटच्या या मॅरेथॉन खेळीचं महत्व समजू शकेल.

अनेक रेकॉर्ड्सची नोंद

जो रुटची ही चौथी डबल सेंच्युरी आहे. याचबरोबर त्यानं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनच्या (Kane Willamson) चार डबल सेंच्युरींची बरोबरी केली आहे. विल्यमसननं याच सिझनमध्ये वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान विरुद्ध डबल सेंच्युरी केली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीशी (Virat Kohli) विल्यमसनची नेहमी तुलना केली जाते. या दोघांपेक्षा विराटच्या जास्त डबल सेंच्युरी आहेत. विराटच्या नावावर सात डबल सेंच्युरी असून त्या सर्व डबल सेंच्युरी त्यानं कॅप्टन झाल्यावर झळकावल्या आहेत.

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (ICC World Test Championship) डबल सेंच्युरी झळकावणारा रुट हा तिसरा कॅप्टन आहे. यापूर्वी विराट कोहली आणि केन विल्यमसन या कॅप्टननी या चॅम्पीयनशीपमध्ये डबल सेंच्युरी झळकावली आहे.

( वाचा : NZ vs PAK: केन विल्यमसनची सलग तिसऱ्या टेस्टमध्ये सेंच्युरी, अनेक रेकॉर्ड्सना गवसणी )

श्रीलंकेविरुद्ध वरचष्मा

श्रीलंकेच्या टीमविरुद्ध रुटची बॅट नेहमीच चालली आहे. त्यानं सात वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या विरुद्धच लॉर्ड्सवर (Lords) पहिली डबल सेंच्युरी झळकावली होती. श्रीलंकेत डबल सेंच्युरी झळकावणारा रुट हा पहिलाच इंग्लंडचा बॅट्समन आहे. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्ध एकापेक्षा जास्त सेंच्युरी झळकावणाराही रुट पहिलाच इंग्लिश बॅट्समन आहे.

8 हजार रन्स पूर्ण

रुटची ही 98 वी टेस्ट मॅच आहे. या टेस्ट मॅचमध्ये त्यानं 8 हजार रन्सचा टप्पा पूर्ण केला. या प्रवासात त्यानं 18  सेंच्युरी आणि 49 हाफ सेंच्युरी पूर्ण केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 8 हजार रन्स पूर्ण करणारा तो एकूण 31 वा तर इंग्लंडचा सातवा बॅट्समन आहे.

( वाचा : अजिंक्य रहाणेच्या अविस्मरणीय सेंच्युरीवर जळणाऱ्या ब्रिटीश मीडियाला वासिम जाफरने दिलं खणखणीत उत्तर! )

श्रीलंकेविरुद्धच्या खेळीत त्यानं वेस्ट इंडिजचे ऑल राऊंडर गॅरी सोबर्स (Gary Sobers) (8,032) आणि ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन मार्क वॉ (Mark Waugh) (8,029) यांना मागं टाकलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading