फोटो – ट्विटर / BCCI

भारतामधील देशांतर्गत क्रिकेट सय्यद मुश्ताक अली T20 (Syed Mushtaq Ali Trophy 2021) स्पर्धेनं सुरु झालं आहे. IPL 2021 साठी खेळाडूंचं ऑक्शन 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही स्पर्धा गाजवणाऱ्या कोणत्या बॉलर्सना (SMAT 2021 Bowlers) या वर्षी आयपीएलचं (IPL) दार उघडू शकतं ते पाहूया

एम. सिद्धार्थ (M. Siddharth)  

तामिळनाडूनं (Tamil Nadu) सिद्धार्थला स्पर्धेच्या थेट फायनलमध्ये खेळवलं. संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच न खेळलेला सिद्धार्थनं टीमचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानं फायनलमध्ये 20 रन देत चार विकेट्स घेतल्या. यामध्ये संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेला बडोद्याचा कॅप्टन केदार देवधरच्या (Kedar Devdhar) विकेटचाही समावेश होता.

सिद्धार्थला मागच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) खरेदी केलं होतं. मात्र त्याला एकाही मॅचमध्ये संधी न देता यावर्षी मुक्त केलं. आता फायनलमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला यंदाही आयपीएल टीम खरेदी करण्याची शक्यता आहे.

( वाचा : SMAT: तामिळनाडूनं संपवला 14 वर्षांचा वनवास, बडोद्याला 7 विकेट्सनं पराभूत करत दिनेश कार्तिकची टीम चॅम्पियन! )

आशुतोष अमन (Ashutosh Aman)

बिहारचा (Bihar) कॅप्टन आशुतोष अमन गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. त्यानं मुश्ताक अली स्पर्धेत सर्वात जास्त 16 विकेट्स घेतल्या आहेत. सहापैकी 2 मॅचमध्ये त्यानं 4 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तसंच त्याचा इकॉनॉमी रेट 5.08 आहे.

डाव्या हातानं अचूक स्पिन बॉलिंग (Wrist Spinner)  करणाऱ्या बॉलरचं T20 फॉरमॅटमध्ये नेहमीच महत्त्व आहे. त्यामुळे यंदा अमनला या स्पर्धेतील कामगिरीमुळे आयपीएल टीममध्ये संधी मिळू शकते.

लुकमन मारिवाला (Lukman Meriwala)

बडोद्याला (Bardoa) फायनलपर्यंत नेण्यात लुकमन मारिवालाच्या बॉलिंगचं मोठं योगदान होतं. त्यानं या स्पर्धेतील 8 मॅचमध्ये 15 विकेट्स घेतल्या. तो दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर (SMAT 2021 Bowlers) होता. T20 क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. त्यानं यापूर्वी तीनदा T20 मॅचमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तसंच तो चांगला इकॉनॉमिकल बॉलर देखील आहे.

डावखुऱ्या फास्ट बॉलर्सची (Left Arm Pacers) भारतामध्ये असलेली कमतरता पाहता मारिवालाकडं या लिलावात आयपीएल टीमचं लक्ष जाण्याची शक्यता आहे.

( वाचा : SMAT: बडोद्याच्या बॅट्सनननं शेवटच्या बॉलवर मारला धोनीच्या स्टाईलनं सिक्सर, टीमची सेमी फायनलमध्ये धडक! )

चेतन सकारिया (Chetan Sakariya)

सौराष्ट्राच्या (Saurashtra ) फास्ट बॉलरनं या स्पर्धेतील 5 मॅचमध्ये 12 विकेट्स घेतल्या. त्यापेक्षाही त्याचा इकॉनॉमी रेट हा फक्त 4.90 इतकाच होता. त्यानं या स्पर्धेत तब्बल 65 बॉल निर्धाव (मेडन) टाकले आहेत. तसंच एका मॅचमध्ये पाच विकेट्स घेण्याचीही किमया केली आहे. विदर्भाविरुद्धच्या लढतीत त्यानं 4 ओव्हरमध्ये फक्त 11 रन देत पाच विकेट्स घेतल्या होत्या.

पॉवर प्लेमध्ये तसंच डेथ ओव्हर्समध्ये अशा दोन्ही टप्प्यात उत्तम बॉलिंग करण्याची क्षमता चेतनकडं आहे. त्यामुळे या 22 वर्षाच्या तरुण बॉलरला खरेदी करण्यासाठी आयपीएल टीममध्ये चांगलीच चुरस रंगू शकते.

जलाज सक्सेना (Jalaj Saxena)

रणजी क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला जलाज या स्पर्धेत केरळच्या (Kerala) टीम कडून खेळला. ऑफ स्पिनर असलेल्या जलाजनं इनिंगच्या मधल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करत 10 विकेट्स घेतल्या आहेत. तो केरळकडून सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर ठरला.  बॅट्समन्सची पुढची चाल काय असेल याचा अंदाज घेऊन बॉलिंग करण्याची क्षमता त्याच्याकडं आहे. IPL स्पर्धेच्या उत्तरार्धात जेंव्हा पिच स्पिन बॉलिंगला मदत करेल तेंव्हा जलाजचा हा अनुभव उपयोगी ठरु शकतो.  

( वाचा : IPL 2021: मुंबई इंडियन्सला प्रभावित करणारा नागालँडचा 16 वर्षांचा बॉलर, पाहा VIDEO )

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन आयपीएल टीमचा तो यापूर्वी सदस्य होता. मात्र एकाही टीमकडून त्याला आयपीएल मॅच खेळण्याची संधी मिळालेली नाही. या आयपीएल ऑक्शननंतर हा इतिहास बदललेल अशी आशा जलाजला असेल.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: