फोटो – सोशल मीडिया

दिवस उलटतात. काळ बदलतो. माणसं वयानं आणि अनुभवानं अधिक प्रगल्भ होतात. यापूर्वी केलेल्या चुका ते टाळण्याचा प्रयत्न करतात. हा जगातील सर्वसामान्य संकेत आहे.पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League 2022) याच्या उलट सुरू आहे. या लीगमधील 2 खेळाडूंनी गेल्या 4 वर्षात कसलंही शहाणपण शिकलेलं नाही. त्यांच्यामध्ये 4 वर्षांपूर्वी भर मैदानात वाद झाला होता, यंदाही मैदानात खुन्नस (Tanvir vs Cutting Clash) निघाली आहे.

4 वर्षांपूर्वी काय झाले…

पाकिस्तानचा फास्ट बॉलर सोहेल तन्वीर (Sohail Tanvir) आणि ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर बेन कटींग (Ben Cutting) या दोघांना गेल्या 4 वर्षात काहीही शहाणपण आलेलं नाही. त्या दोघांच्या वर्तनातून हेच सिद्ध झाले. या दोघांमध्ये 2018 साली वाद झाला होता. आता 2022 साली पुन्हा एकदा त्यांच्यातील खुन्नस दिसली.

यंदा फक्त लीग बदलली आहे. 2018 साली वेस्ट इंडिजमधील कॅरेबीयन प्रीमियर लीग (CPL) स्पर्धेत दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी सेंट किट्सकडून खेळणाऱ्या कटींगनं गयानाकडून खेळणाऱ्या तन्नीरच्या बॉलिंगवर काही सिक्स लगावले. ते तन्वीरला आवडलं नाही. तन्वीरनं अखेर कटींगला आऊट केलं आणि लगेच त्याने कटींगला उद्देशून आक्षेपार्ह वर्तन (Tanvir vs Cutting Clash) केले.

या आक्षेपार्ह वर्तनासाठी सोहेल तन्वीरच्या मॅच फिसमधील 15 टक्के रक्कम दंड म्हणून कमी करण्यात आली होती. त्यावेळी तन्वीरने कटींगला उद्देशून मिडल फिंगर दाखवले होते.

पाकिस्तानच्या माजी कॅप्टनमध्ये जाहीर वाद, एक म्हणाला फिक्सर, तर दुसऱ्यानं कंडक्टर म्हणून केली हेटाळणी

आता काय झाले?

यंदा पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) कटींग आणि तन्वीर खेळत आहेत. कटींग पेशावर झाल्मी (Peshawar Zalmi) आणि तन्वीर क्वेटा ग्लॅडिएटर्स (Quetta Gladiators) कडून खेळत आहे. या दोघांच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा तन्वीर विरुद्ध कटींग संघर्ष पाहयला मिळाला.

या मॅचमध्ये कटींगने तन्वीरला पुन्हा एकदा सिक्सर्स लगावले. कटींग फक्त सिक्सर्स लगावून थांबला नाही तर त्याने तन्वीरला मिडल फिंगर दाखवले. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. हा वाद इथेच संपला नाही. तन्वीरनं पुढच्या ओव्हरमध्ये कटिंगला आऊट केले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं कटींगला उद्देशून मिडल फिंगर (Tanvir vs Cutting Clash) दाखवले.

या सर्व प्रकाराबद्दल दोन्ही खेळाडूंच्या मॅच फिसमधील 15 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे.

अखेर कोण जिंकले?

तन्वीर विरूद्ध कटींग वादाने गाजलेली ही मॅच बेन कटींगच्या पेशावरने 24 रनने जिंकली. पेशावरने पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 185 रन केले. क्वेटाला 186 रनचे टार्गेट पेलवले नाही. त्यांना 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 161 रन करता आले. बेन कटिंगनं 14 बॉलमध्ये 1 फोर आणि 4 सिक्ससह केलेली 36 रनची खेळी या विजयात (Tanvir vs Cutting Clash) निर्णायक ठरली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: