फोटो – BCCI

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या सिझनला 9 एप्रिल रोजी सुरुवात होत आहे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील लढतीनं चेन्नईत ही स्पर्धा सुरु होत आहे. मुंबई इंडियन्सनं आजवर पाच वेळा ही स्पर्धा जिंकली असून आरसीबीला अद्यापही पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. आयपीएल स्पर्धेत दरवर्षी नवे रेकॉर्ड होतात. पण, या स्पर्धेतील काही रेकॉर्ड्स हे मोडण्यास अत्यंत कठीण (Unbreakable records of IPL) असे आहेत.

ख्रिस गेल नाबाद 175

टी-20 क्रिकेटचा युनिव्हर्सल बॉस असलेल्या ख्रिस गेल (Chris Gayle) याने आयपीएलमध्ये अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्यापैकी 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलेल्या नाबाद 175 रनचाही समावेश आहे. पुणे वॉरियर्सविरुद्ध  फक्त 66 बॉलमध्ये गेलनं ही कामगिरी केली होती.

आयपीएल स्पर्धेतील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. गेलचा हा रेकॉर्ड मोडण्यास अत्यंत कठीण (Unbreakable records of IPL) आहे. तो मोडण्यासाठी कुणीतरी गेलपेक्षा अधिक विध्वमंसकारी खेळ करणे आवश्यक आहे.

गेलचे आणखी काही रेकॉर्ड

ख्रिस गेलचा हा फक्त एकच रेकॉर्ड मोडण्यास कठीण आहे, असे नाही. पुणे वॉरियर्सच्या मॅचमध्ये गेलनं फक्त 30 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली होती. त्याचबरोबर त्या मॅचमध्ये गेलनं 17 सिक्स लगावले होते. गेलचे हे दोन्ही रेकॉर्ड मोडण्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत.

( वाचा : 41 वर्षांचा ख्रिस गेल म्हणतो,’आणखी पाच वर्ष क्रिकेट खेळणार’ ‘युनिव्हर्सल बॉस’ ची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क! )

मिश्राजींना कोण मागे टाकणार?

आयपीएलच्या 13 सिझनमध्ये फक्त 14 बॉलर्सना आत्तापर्यंत हॅट्ट्रिक घेणे जमले आहे. यावर्षी या यादीमध्ये कुणाची भर पडते का? याची उत्सुकता आहे. या यादीमध्ये यंदा एकाची किंवा काहींची भर पडू शकते. पण या स्पर्धेत सर्वात जास्त हॅट्ट्रिक घेण्याचा अमित मिश्राचा (Amit Mishra) रेकॉर्ड कुणी मागे टाकण्याची शक्यता सध्या तरी नाही.

अमित मिश्रानं आयपीएल स्पर्धेत एकूण 3 वेळा हॅट्ट्रिक घेतली आहे. मिश्राने 2008, 2011 आणि 2013 च्या आयपीएलमध्ये हा पराक्रम केला आहे.

कोहलीची करामत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) 2016 चा आयपीएल सिझन स्वप्नवत होता. त्या सिझनमध्ये विराटनं तब्बल 973 रन काढले होते. आयपीएलच्या एका सिझनमध्ये 900 पेक्षा जास्त रन करणारा विराट हा एकमेव बॅट्समन आहे. तसेच एका सिझनमध्ये सर्वात जास्त 4 सेंच्युरी झळकावण्याचा रेकॉर्ड देखील विराटच्या नावावर असून तो देखील अद्याप अबाधित (Unbreakable records of IPL) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: