फोटो – सोशल मीडिया

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) मुंबईतील पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मौन सोडले आहे. विराटनं मुंबईतील पत्रकार परिषदेत कॅप्टनशिप सोडण्याच्या विषयावर त्याची बाजू मांडली होती. विराटच्या त्या पत्रकार परिषदेनंतर सौरव गांगुलीच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर गांगुलीने अखेर मौन सोडले असून या विषयावर पुढे काय करणार (Ganguly On Virat) हे देखील सांगितले आहे.

काय म्हणाला विराट?

वन-डे टीमची कॅप्टनसीवरुन हटवण्याचा निर्णय निवड समितीनं फक्त दीड तास आधी सांगितला असा दावा विराटने केला होता. त्यापूर्वी कुणीही आपल्याला याबाबत संपर्क केला नव्हता. मी T20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय बीसीसीआयला कळवला त्यावेळी त्यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं होतं.

मी त्यांच्यासमोर (BCCI) माझी भूमिका मांडली होती. त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला. T20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस असं बीसीसीआयच्या वतीने कुणीही सांगितलं नाही, असा दावा विराटने केला होता.

रोहित शर्माशी संबंध ते सौरव गांगुलीचे वक्तव्य विराट कोहलीने दिले 5 मोठ्या मुद्यांवर स्पष्टीकरण

गांगुलीने सोडले मौन

विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेत एकप्रकारे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाला होता. कारण, विराटनं T20 टीमची कॅप्टनसी सोडू नये असा सल्ला मी त्याला दिला होता, असे गांगुलीने यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे विराट आणि गांगुली यांच्यात कोण खरं बोलतंय हा प्रश्न निर्माण झाला होता.

गांगुलीनं या विषयावर आणखी काही बोलण्यास (Ganguly On ) नकार दिला आहे. पण, त्याचवेळी हे सर्व प्रकरण आता बीसीसीआय आपल्या पद्धतीने निकाली लावेल, असंही स्पष्ट केलं आहे. या विषयावर बीसीसीआय कोणतेही वक्तव्य प्रसिद्ध करणार नाही किंवा पत्रकार परिषद घेणार नाही. आम्ही हे प्रकरण आमच्या पद्धतीने सोडवू असे गांगुलीने सांगितले आहे.

निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) हे बीसीसीआयच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडणार असल्याची चर्चा सुरू होती पण, अशी कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याचे गांगुलीने स्पष्ट केले (Ganguly On Virat)  आहे.

टीम इंडिया रवाना

भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय असा वाद निर्माण झालेला असतानाच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. या दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वन-डे मॅच होणार आहेत. विराट कोहली हा टेस्ट टीमचा कॅप्टन आहे.

भारतीय टीमला आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. यंदा तो इतिहास रचण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सेंच्युरीची 2 वर्षांपासून लांबलेली प्रतीक्षा या दौऱ्यात संपणार का? याकडेही क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: