फोटो – टाईम्स ऑफ इंडिया

टीम इंडियाचा आक्रमक आणि झुंजार कॅप्टन अशी सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) ओळख आहे.  मॅच फिक्सिंगनंतरच्या अवघड काळात गांगुली टीमचा कॅप्टन झाला. त्यानं फक्त टीम उभी केली नाही, तर जगभरात जिंकून देखील दाखवली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या क्रिकेट विश्वात श्रेष्ठत्वाचा आणि अहंकाराचा टेंभा मिरवणाऱ्या देशांच्या टीमला गांगुलीच्या टीम इंडियानं (Team India) चोख उत्तर दिलं. गांगुली आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयचा (BCCI)  अध्यक्ष आहे. कॅप्टनसीच्या काळात आपण एक महत्त्वाचा धडा वीरेंद्र सेहवागकडून शिकलो (Ganguly on Sehwag) असा गौप्यस्फोट गांगुलीनं नुकत्यात एका मुलाखतीमध्ये केला आहे.

ऐतिहासिक मॅचमध्ये वीरुनं शिकवलं!

सौरव गांगुलीच्या करियरचा विचार करताना लॉर्ड्सवर झालेली नेटवेस्ट सीरिजची फायनल (NatWest Series Final 2002)  कुणीही विसरु शकत नाही. या फायनलमध्ये इंग्लंडच्या 326 रनचा पाठलाग करताना गांगुलीनं आधी आक्रमक 60 रन काढत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर भारताने मॅच जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये शर्ट काढून इंग्लंडच्या मुजोरीला उत्तर दिलं.

गांगुलीनं एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये फायनलमध्ये वीरेंद्र सेहवागनं दिलेली शिकवणीबद्दल (Ganguly on Sehwag) सांगितलं आहे. ‘आम्हाला 325 रनचा पाठलाग करायचा होता. मी सुरुवातीला नर्व्हस होतो. त्यावेळी सेहवागनं मला सांगितलं की आपण जिंकणार. मी त्याला सांगितलं की,  आपण सुरुवातीपासूनच नव्या बॉलवर खेळत आलो आहोत. आपण लवकर विकेट गमावता कामा नये. आपण सिंगलवर फोकस दिला पाहिजे.

रोनी इराणी पहिला बॉल टाकायला आला. सेहवागनं त्यावर फोर मारला. त्यानंतर मी त्याला पुढच्या बॉलवर एक रन काढण्याची सूचना दिली. सेहवागनं दुसऱ्या बॉलवरही फोर लगावला. तिसरा बॉलही त्यानं बाऊंड्री लाईनच्या बाहेर पिटाळला. मला खूप राग येत होता. सेहवागवर त्याचा परिणाम झाला नाही. त्यानं पाचव्या बॉलवर पुन्हा एक फोर लगावला.’

( वाचा : ON THIS DAY: नजफगडचा नवाब बनला मुलतानचा सुलतान! )

‘…आणि मला धडा मिळाला’

गांगुली हा अनुभव सांगितल्यावर पुढे म्हणतो, ‘ मला लवकरच लक्षात आलं की सेहवागला अडवण्यात (Ganguly on Sehwag)  काहीही अर्थ नाही. कारण त्याचा स्वाभाविक खेळ हा आक्रमक आहे. मॅन मॅनेजमेंट ही कॅप्टनसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एका चांगल्या कॅप्टनला खेळाडूच काय पद्धतीनं विचार करतो, हे समजलं पाहिजे.’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: