
टीम इंडियाचा माजी कोच ग्रेग चॅपेल (Greg Chappell) याने पुन्हा एकदा गरळ ओकली टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) चॅपल यांनी विखारी टीका (Chappell on Ganguly) यांनी केली आहे. चॅपेल 2005 ते 2007 या काळात टीम इंडियाचे कोच होते. त्यांच्या काळात टीम इंडिया अफाट प्रयोगानं गाजली. सचिन तेंडुलकर ते इरफान पठाण सर्वांच्या बॅटींगचे क्रमांक बदलण्यात आले. याच प्रयोगातून टीम 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2007) टीम इंडिया पहिल्याच फेरीत बाद झाली होती.
बुकानन कोच होते म्हणून
ग्रेग चॅपेल यांनी Cricket Life Stories या पॉडकास्टमध्ये बोलताना गांगुलीवर टीका करण्यात वेळ घालवला आहे. ‘गांगुलीनं सर्वात प्रथम मला कोच होण्यासाठी संपर्क साधला. माझ्यासमोर अन्य प्रस्ताव होते. त्यावेळी जॉन बुकानन (John Buchanan) ऑस्ट्रेलियाचे कोच होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया नाही तर भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशाच्या क्रिकेट टीमचं कोच होण्याची संधी स्वीकारली,’ असं चॅपेलनं सांगितले.
गांगुलीबद्दल म्हणाले…
‘भारतामधील ते दोन वर्ष प्रत्येक बाबतीमध्ये आव्हानात्मक होती. माझ्याकडून अपेक्षा खूप होत्या. माझ्यासमोरील काही समस्यांचं कारण हा सौरव गांगुली होता. तो कॅप्टन होता म्हणून काही प्रश्न निर्माण झाले होते. त्याची कठोर मेहनत करण्याची इच्छा नव्हती. त्याला खेळात सुधारणा करायची नव्हती. त्याला फक्त टीमचा कॅप्टन राहून सर्व गोष्टी नियंत्रित ठेवायच्या होत्या, ‘ असा आरोप चॅपेलने (Chappell on Ganguly) केला आहे.
संपूर्ण सीरिजची दिशा ठरवणारे सौरव गांगुलीचे 144 रन्स!
मी टीमचा कोच या नात्याने भारतीय टीममधील कल्चर आणि विचारपद्धती बदलण्याचा प्रयत्न केला. सर्व जमीनदोस्त होण्यापूर्वी टीम इंडियानं राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कॅप्टनसीमध्ये वर्षभर चांगली कामगिरी केली, असं चॅपेलने सांगितले.
वरिष्ठ खेळाडूंवर टीका
सौरव गांगुलीवर सडकून टीका करणाऱ्या चॅपेल यांनी राहुल द्रविडचं मात्र कौतुक केलं आहे. ‘टीम इंडिया जगातील सर्वोत्तम टीम व्हावी म्हणून द्रविडनं खूप कष्ट केले. पण, दुर्दैवानं टीममधील सर्वांना तसे वाटत नव्हते. त्यांचा भर हा फक्त टीममधील जागा कायम राखण्यावर होता. काही वरिष्ठ खेळाडूंनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, कारण ते त्यांच्या करियरच्या शेवटच्या टप्प्यात होते. सौरवला टीममधून वगळल्यानंतर (Chappell on Ganguly) आमच्याकडे खेळाडूंनी लक्ष देण्यास सुरुवात केली. गांगुली गेला तसा कुणीही जाऊ शकतो हे त्यांना समजले होते.” असा दावा चॅपेलने केला.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.