फोटो – सोशल मीडिया

विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेचत आहे. चार महिन्यांपूर्वी त्याने सर्व प्रथम T20 टीमची कॅप्टनसी सोडली. त्यानंतर त्याला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आले. तर टेस्ट टीमच्या कॅप्टनसीचा त्याने मागच्या आठवड्यात राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटनं मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली होती. यावेळी विराटनं थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींवर (Sourav Ganguly) चुकीची माहिती दिल्याचा ठपका दिला होता. विराटच्या या उत्तरामुळे गांगुली चांगलेच संतापले होते. त्यांचा विराटला कारणे दाखवा (Show cause notice to Virat) नोटीस पाठवण्याचा विचार होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे.

काय म्हणाला होता विराट?

विराट कोहलीला T20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस अशी विनंती केल्याचा दावा गांगुली यांनी केला होता. विराटने मुंबईतील पत्रकार परिषदेत हा दावा खोडून काढला. त्याच्या या भूमिकेनंतरच सारा वाद सुरू झाला.

‘मी T20 टीमची कॅप्टनसी सोडण्याबाबत बीसीसीआयशी चर्चा केली. त्यावेळी त्यावेळी बोर्डाने या निर्णयाचे स्वागत केले. मला T20 टीमची कॅप्टनसी सोडू नकोस असे कधीही सांगण्यात आले नाही. मी त्यावेळी वन-डे आणि टेस्ट टीमची कॅप्टसी यापुढेही करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना मला या पदावरून हटवायचं असेल तरी आपली तयारी आहे.’ असे त्यांना कळवल्याचा दावा विराटनं मुंबईतील पत्रकार परिषदेत केला होता.

गांगुलींचा निर्णय

इंडिया अहेड न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, सौरव गांगुली या पत्रकार परिषदेवर नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजवर कधीही झाले नाही, ते करण्याचा निर्णय घेतला होता. गांगुली यांनी या विषयावर विराटला कारणे दाखवा नोटीस (Show cause notice to Virat) पाठवण्याची तयारी केली होती.

बीसीसीआयच्या अन्य सदस्यांनी गांगुली यांना अडवले. दक्षिण आफ्रिकेतील सीरिज सुरू असताना या प्रकारची कृती योग्य नाही, असा त्यांनी सल्ला दिला गांगुली यांनी तो सल्ला मानला, असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला.

विराट कोहलीच्या वक्तव्यावर गांगुलीचं उत्तर, दादाने सांगितलं पुढं काय करणार?

अखेर राजीनामा

विराट कोहलीनं भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिज संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टेस्ट टीमच्या कॅप्टन पदाचा राजीनामा दिला. त्याने मॅच झाल्यानंतर याबाबतची कल्पना ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना दिली. त्यानंतर राजीनामा सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यापूर्वी काही तास आधी विराटने बीसीसीआय सचिव जय शहा यांना फोनवर निर्णयाची कल्पना दिली, पण गांगुली यांना कळवले नाही, असा दावा देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

बीसीसीआयकडून त्याला यावेळी राजीनामा देण्यापासून थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. त्याचा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्डानं तात्काळ मान्य (Show cause notice to Virat) केला. बीसीसीआय आणि स्वत: गांगुली यांनी सोशल मीडियावरून विराटला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: