दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डीव्हिलियर्स (AB De Villiers) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार अशी काही महिन्यांपूर्वी मोठी चर्चा होती. डीव्हिलियर्सनं त्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला. ‘आपल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या खेळाडूवर अन्याय होऊ नये’ म्हणून डीव्हिलियर्सची पुनरागमन करण्याची इच्छा नाही, असं त्यावेळी सांगितलं गेलं. मात्र, आता डीव्हिलियर्सवर त्याच्याच देशाच्या क्रिकेटपटूनं गंभीर आरोप (Allegation against de Villiers) केला आहे.

‘मला संधी मिळू नये म्हणून डी व्हिलियर्सनं विकेट किपिंग केली’, असा आरोप थामी सोलेकिले (Thami Tsolekile) या दक्षिण आफ्रिकेच्या कृष्णवर्णीय विकेट किपरनं केला आहे. मार्क बाऊचर रिटायर झाल्यानंतर त्याच्या जागेवर माझा दावा होता, पण डी व्हिलियर्सनं विकेट किपर होत माझी जागा अडवली. मार्क बाऊचर (Mark Boucher) खेळत असताना त्याने कधीही विकेट किपिंग केली नाही. त्याची तशी इच्छा नव्हती. त्यानंतरच त्याला विकेट किपर होण्याची इच्छा झाली. यावरुन तुम्ही काय ते समजू शकता,’ असा आरोप (Allegation against de Villiers)  थामीनं  केला आहे.

6 वर्षांपूर्वीची धक्कादायक गोष्ट ठरली डीव्हिलियर्स परत न येण्याचं कारण?

कोण आहे थामी?

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट वर्तुळातील गुणवान विकेट किपर म्हणून थामी प्रसिद्ध होता. त्याने या शतकाच्या सुरुवातीला अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमची कॅप्टनसी केली आहे. थामी 2004 साली भारताविरुद्ध दोन आणि इंग्लंड विरुद्ध एक टेस्ट खेळली आहे. थामीच्या तिसऱ्या टेस्टमध्ये डी व्हिलियर्सनं पदार्पण केले. थामी आणि डी व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेसाठी एकत्र खेळलेले ती पहिली आणि शेवटची टेस्ट होती.

देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खेळामुळे तो 2011 साली पुन्हा एकदा निवड समितीच्या रडारवर होता. मार्क बाऊचर 2012 साली रिटायर झाल्यानंतर त्याची पुन्हा एकदा बॅकअप विकेट किपर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली. पण, त्याला कधीही अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही. थामीनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 6 सेंच्युरीसह 5844 रन केले आहेत. तसंच 499 कॅच आणि 35 स्टंपिंग देखील त्याच्या नावावर आहेत. 2016 साली दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या भ्रष्टाचार विरोधी समितीनं मॅच फिक्स केल्याच्या आरोपाबद्दल थामीवर 12 वर्ष क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली आहे.

आणखी एका खेळाडूचा दुजोरा

हा आरोप करणारा थामी हा एकमेव खेळाडू नाही. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लोनवाबो सोत्सबे (Lonwabo Tsotsobe) याने देखील या  प्रकारचा आरोप यापूर्वी (Allegation against de Villiers) केला होता. न्यूझीलंड विरुद्ध 2012 साली झालेल्या सीरिजमध्ये थामीला अंतिम 11 मध्ये संधी मिळू नये म्हणून दक्षिण आफ्रिकेचा तेव्हाचा कॅप्टन ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) याने डी व्हिलियर्सला विकेट किपर केले. थामीची टीममध्ये निवड केली तर आपण राजीनामा देऊ अशी धमकी स्मिथनं दिली होती,’ असा आरोप सोत्सबेनं केला होता.

पहिल्या मॅचमध्ये हॅटट्रिक, शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीची विकेट आणि वर्ल्ड कप विजेतेपद

स्मिथनं फेटाळले आरोप

ग्रॅमी स्मिथनं सोत्सबेचे हे आरोप फेटाळले आहेत. ‘माझ्यावरचे आरोप हे निराधार आहेत. मी माझी पसंती टीम मॅनेजमेंटला कळवली होती. थामी त्या दौऱ्यात केवळ एबी डीव्हिलियर्सचा बॅक अप विकेट किपर होता. ही गोष्ट गॅरी कस्टर्नने सुरुवातीलाच स्पष्ट केली होती. थामी हा टीममधील एकाच जागेसाठी (विकेट किपर) दावेदार होता. दक्षिण आफ्रिकेतील अनेक विकेट किपरमध्ये गुणवत्ता होती. पण, दुर्दैवाने त्यांची त्या जागेसाठी निवड होऊ शकली नाही.’ असे स्मिथने या आरोपांना उत्तर दिले आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: