फोटो – ट्विटर, डेल स्टेन

दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी बॉलर डेल स्टेन सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायर (Dale Steyn Retires) झाला आहे. तो बऱ्याच काळापासून दुखापतींशी झुंज देत होता. टेस्ट क्रिकेट सोडल्यानंतर स्टेननं टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. पण दुखापतीमुळे तो पुन्हा टीमच्या बाहेर गेला. त्यानं फेब्रुवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची आंतरराष्ट्रीय T20 मॅच खेळली होती.  

काय म्हणाला डेल स्टेन?

डेल स्टेननं त्याच्या रिटायरमेंटची घोषणा करताना म्हंटले आहे की, ’20  वर्ष ट्रेनिंग, मॅच, प्रवास, विजय, पराजय, जेट लेग, पट्टी बांधलेले पाय आणि बंधुत्वाची भावना. सांगण्यासारखं खूप काही आहे. मला अनेकांचे आभार व्यक्त करायचे आहेत. आज मी अधिकृतपणे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायर (Dale Steyn Retires) होत आहे. सर्वांना धन्यवाद.’

डेल स्टेनची कारकिर्द

डेल स्टेननं 2004 साली इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याची सुरुवातीची कामगिरी साधारण होती. त्यामुळे त्याला टीममधून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्यानं इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत खेळामध्ये सुधारणा केली. 2006 साली तो टीममध्ये परतला. त्या पुनरागमनानंतर स्टेननं मागं वळून पाहिलं नाही.

स्टेननं 93 टेस्टमध्ये 439, 125 वन-डेमध्ये 196 आणि 47 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 64 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्स पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त एक विकेट कमी पडली. डेल स्टेननं फॉर्मात असताना वेग आणि स्विंगच्या जोरावर जगभरातील बॅट्समनची झोप उडवली होती. त्यामुळे ‘स्टेन गन’ अशीही त्याची ओळख होती. तो 2043 दिवस नंबर 1 टेस्ट बॉलर होता. जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

‘ ती’ इच्छा अपूर्ण….

डेल स्टेनला 2019 वर्ल्ड कपमधून (Cricket World Cup 2019) दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर 2020  साली दक्षिण आफ्रिकेच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीमधूनही त्याला वगळण्यात आले होते. त्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 सीरिजमध्ये त्याची निवड झाली होती.

मागील वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा T20 वर्ल्ड कप खेळण्याची स्टेनची इच्छा होती. मात्र कोरोनामुळे तो वर्ल्ड कप एक वर्ष पुढे गेला. आता ऑक्टोबरमध्ये हा वर्ल्ड कप होणार आहे. त्यापूर्वीच त्यानं क्रिकेटला अलविदा (Dale Steyn Retires) केला. T20 वर्ल्ड कप खेळून रिटायर होण्याची त्याची इच्छा अखेर अपूर्णच राहिली आहे.

चुकलेल्या गणितासाठी लक्षात राहणारा ऑल राऊंडर!

IPL मध्ये जलवा

डेल स्टेन आयपीएलचा ही नियमित खेळाडू होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लॉयन्स या टीमकडून तो खेळला. त्यानं 95 आयपीएल मॅचमध्ये 97 विकेट्स घेतल्या. दुखापतीनं ग्रस्त असलेल्या स्टेनवर विराट कोहलीनं (Virat Kohli) नं विश्वास दाखवत पुन्हा एकदा आरसीबी टीमध्ये निवडलं होतं. पण तो फार प्रभाव टाकू शकला नाही.

स्टेननं यावर्षी जानेवारी महिन्यात आपण आयपीएल खेळणार नसल्याचं (Dale Steyn Retires) जाहीर केलं. पण तो पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धा खेळत होता. या स्पर्धेत खेळताना त्यानं आयपीएलवर टीका केल्यानं त्याचे अनेक फॅन्स दुखावले होते.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: