फोटो – सोशल मीडिया

भारताचा माजी फास्ट बॉलर शांताकुमारन श्रीसंत (S.Sreesanth) सात वर्षानंतर क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Mushtaq Ali T20) श्रीसंतचा केरळ (Kerala)च्या टीममध्ये समावेश करण्यात आलाय. आयपीएल (IPL) स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) करण्याच्या प्रकरणात  त्याच्यावर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

( वाचा : अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची ‘आमिर’ कथा! )

… म्हणून लांबले पदार्पण

श्रीसंतवरील बंदी यावर्षी सप्टेंबर महिन्यात संपली. त्यानंतर लगेच तो केरळमधील एका स्थानिक स्पर्धेत खेळणार होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे BCCI नं ती स्पर्धा रद्द केली होती. त्यामुळे श्रीसंतचं क्रिकेटमधील पदार्पण लांबले. कोरोनाच्या ब्रेकनंतर पुढच्या महिन्यामध्ये भारतामध्ये स्थानिक क्रिकेट पुन्हा सुरु होत आहे. त्या स्पर्धेत श्रीसंतच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष असेल.

श्रीसंतनं केरळ टीममध्ये पुन्हा सहभागी झाल्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. “एक मोडून पडलेला माणूस जेंव्हा स्वत:ला पुन्हा सज्ज करतो त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तसंच पाठिंब्याबद्दल आभार’’, या शब्दात त्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कधी खेळला होता क्रिकेट?

श्रीसंत आयपीएल 9 मे 2013 रोजी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (KIXP) या आयपीएलच्या मॅचमध्ये शेवटचं खेळला होता. तर त्याला आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट खेळून 9 वर्ष झाले आहेत. इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट 2011 मध्ये तो शेवटची टेस्ट खेळला. इंग्लंडनं ती टेस्ट एका इनिंग आणि 8 रननं जिंकली होती. श्रीसंतनं त्या मॅचमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या.

( वाचा : सर रवींद्र जडेजा, धोनी आणि विराटनंतर खास रेकॉर्ड करणारे तिसरे भारतीय! )

संजू सॅमसन टीमचा कॅप्टन

राजस्थान रॉयल्स आणि टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू संजू सॅमसन (Sanju Samson) या स्पर्धेत केरळच्या टीमचा कॅप्टन आहे. तर सचिन बेबी व्हाईस कॅप्टन आहे. केरळच्या टीममध्ये बसिल थंपी, जलज सक्सेना, रॉबिन उथप्पा, आसिफ के.एम. यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्याचबरोबर चार नव्या खेळाडूंनाही टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: